Pages

Friday, December 30, 2016

जळगाव जिल्हा ग्रंथ व दिंडी महोत्सव

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान योजनेतंर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव आयोजित तीन दिवशीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलीत शाररिक शिक्षण महाविद्यालयात आयोजन करण्यात आले.



सकाळी दहा वाजेला आयएमआर कॉलेजच्या प्रांगणातून ग्रंथ दिंडी व सजवलेल्या रथाची दिंडी सवाद्या काढण्यात आली. या दिंडीला माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांनी झेंडी देवून सुरूवात करण्यात आली. .यावेळी उपशिक्षणाधिकारी अरूण पाटील, विकास पाटील, सिध्दार्थ नेतकर मुख्याध्यापक संघाचे सचिव सी.डी.पाटील, जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष खंबायत व इतर मुख्याध्यापक, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष बी.बी.जोगी, सचिव सुनिल वानखेडे, सहसचिव एस.डी.पाटील, एस.आर.झांबरे, बी.आर. महाजन, गोपाळ महाजन आदि उपस्थित होते. या मिरवणुकीत लेझीम पथक नंदिनीबाई विद्यालयाचे, आर.आर. विद्यालयाचे बॅडपथक, विज्ञान रथ व पालखी सार्वजनिक विद्यालय, आसोदा यांचा सामावेश होता


जिल्हाभरात विज्ञानाच्या उपक्रमांची माहिती पोहचावी यासाठी विज्ञान उपक्रम माहिती पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तीकेमुळे वि्दयार्थ्यांना वर्षभरातील उपक्रमांची व त्यासाठी करण्यात येणाऱ्या गुणदानांची माहिती मिळणार आहे.

Tuesday, December 13, 2016

इन्सपायर अवॉर्ड ऑनलाइन नामांकने सादर करणेबाबत


जिल्हा स्तरीय ग्रंथ महोत्सव व विज्ञान प्रदर्शन सभा

जिल्हा स्तरीय ग्रंथ महोत्सव व विज्ञान प्रदर्शन संदर्भात दि. १३/१२/२०१६ वार मंगळवार रोजी सर्व तालुका समन्वयकांची सभा जि.प. विद्यानिकेतन, जळगाव येथे झाली त्याची क्षणचित्रे 




Wednesday, October 12, 2016

शिकूया विज्ञान ऑनलाईन

विज्ञान किंवा Science हा विषय अत्यंत व्यापक आहे. Science हा शब्द मूळ लॅटीन शब्द scientiaपासून तयार झाला. scientia चा अर्थ आहे "knowledge" किंवा ज्ञान. विज्ञान हा प्रयत्न आहे ह्या जगातली आश्चर्य शोधण्याचा, निरीक्षणाचा, समजून घेण्याचा आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याचा वापर करण्याचा. विज्ञानात अनेक उपविषय असून प्रत्येक उपविषयाची व्यापकताही खूप मोठी आहे. आजच्या २१व्या युगात विज्ञानामुळेच तर आपले जीवन सुखकर झाले आहे. शाळेत पहिली पासूनच सामान्य विज्ञान शिकायला सुरुवात होते. स्वकृती आणि निरिक्षण पध्दतीपेक्षाही केवळ Inferences वर अधिक भर दिला जातो. त्यामुळे वरच्या वर्गातूनही विद्यार्थी आपल्या निरिक्षणातून नोंदी करुन विषय समजावून घेण्यापेक्षा पाठांतरावर अधिक भर देतांना दिसतात. कधी कधी विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष करण्यापेक्षा फक्त समजावून घेतले जातात तर बरेच वेळेला प्रयोग करतांना ते अत्यंत 'मेकॅनिकल' पध्दतीने केले जातात.
      विज्ञान शिकतांना नोंदी करणे, मूल्यमापन करणे, मोजणे, आखणे, ग्राफ तयार करणे, वेळ मोजणे ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असते. पण बहुतेक वेळा ह्या सुविधा विद्यार्थ्याकडे असतीलच ह्याची खात्री नसते. ह्यासाठी http://www.learningscience.org ह्या साईटवर अत्यंत उपयुक्त अशी असे 'टूल्स' डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहेत. ह्यामध्ये मोजपटटी, कोनमापक, ग्राफपेपर, स्टॉपवॉच वगैरे पासून ते अगदी अद्यावत गुगल इमेजिंग, गुगल मॅप्स आणि गुगल मार्सही आहेत. त्याच बरोबर जीवशास्त्रात गती असणा-यांसाठी 'व्हर्चूअल मायक्रोस्कोपही' आहे.
      www.wonderwhizkids.com ही साईट तर म्हणते मुलांसाठी निसर्ग हाच सर्वात मोठा 'प्रोजेक्ट' आहे. आपला राष्ट्रपक्षी असणा-या मोराचा पिसारा आपल्याला रंगबिरंगी दिसायचे कारण म्हणजे त्याच्यातून परिवर्तीत होणारा प्रकाश होय. आपला मोराच्या पिसा-याकडे बघण्याचा कोन बदलल्यास रंगछटाही वेगळ्या दिसतात. अश्या त-हेचे अनंत प्रश्न प्रत्येक मुलाला पडतच असतात "आकाशाचा रंग निळाच का?" , "पृथ्वीवर ऋतू का असतात?" , "सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला आकाशात तांबडाच रंग का असतो?" ... ह्या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या साईटवर वाचायला मिळतात. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावरही साईट प्रकाश टाकते. त्याचबरोबर विज्ञानाची ऑनलाईन लायब्ररीही आपल्याला ऍक्सेस करता येते.
      http://ncsu.edu/midlink ही साईट माध्यमिक मुलांसाठी विज्ञानाचे मासिक काढते. प्रत्येक सहा महिन्यांसाठी प्रोजेक्ट दिला जातो, जसे 'शिकागोचे दगड बोलू लागले तर?', 'केनियामध्ये शिक्षण खूप महाग असल्यामुळे बहुतेक मुले माध्यमिक शिक्षण पूर्ण करत नाहीत' किंवा 'जड दप्तरांचे मुलांच्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम'... अश्या अनेक विषयांच्या प्रकल्पांवर जगभरातल्या मुलांकडून त्यांच्या नोंदी, मते आणि अभ्यास मागविण्यात आला आहे. अश्या साईट्सच्या निमित्ताने मुले आपला वर्ग सोडून वैश्विक वर्गात सामिल होतात. 
      http://www.justforkidsonly.com/scinfospace.htm ह्या साईटवर भारतातल्या मुलांसाठी वयोगटाप्रमाणे विज्ञानाचे विविध विषय समजावून दिले आहेत. काही मजेदार युक्ताही ह्या साईटवर आहेत जसे की आपल्या सूर्यमालिकेतल्या ग्रहांची नावे लक्षात ठेवायची असल्यास My Very Excellent Mother Just Sent Us Nine Pizzas हे वाक्य पाठ हवे. ह्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षरात ओळीने ग्रहांची नावे दडलेली आहेत जसे M म्हणजे मार्स, V म्हणजे व्हिनस,E म्हणजे अर्थ... वगैरे.
      भारतातही विज्ञान आणि गणित अधिक सोप्या आणि सहज पध्दतीने मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही संस्थांच्या वेबसाईट्स अत्यंत उपयुक्त आहेत. www.navnirmiti.org ह्या साईटवरुन गणित आणि विज्ञान शहरी आणि खेडयातल्या अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यासाठी त्यांनी अनेक संशोधनात्मक उपकरणे तयार केली आहेत. दहा ते बारा वर्षांच्या मुलांना विज्ञान शिकवतांना त्या मुलांचे लक्ष विचलीत होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी नवनिर्मितीने वैज्ञानिक खेळयांबरोबरच विज्ञान पोस्टर्स तयार केली आहेत. ही पोस्टर्स पाठयक्रमाच्या विविध विषयांवर आधारीत आहेत. प्रत्येक पोस्टर्सवरील चित्रे आकर्षक, विषयाची स्पष्ट मांडणी करणारी आणि शिक्षक आणि मुलांमध्ये चर्चा घडवून आणण्यास उपयुक्त आहेत. रोजच्या जीवनातील उदाहरणांवर आधारीत असल्यामुळे प्राथमिक वर्गांच्या कुठल्याही माध्यमाच्या मुलांना वापरता येण्यासारखी आहेत. अश्याच प्रकारचा प्रयोग विज्ञानप्रसार आणि विज्ञानआश्रमानेही (पाबळ) करुन दाखवला आहे त्याविषयी अनुक्रमे www.vigyanprasar.gov.in आणि www.vigyanashram.com ह्या साईटवर माहिती आणि त्यांच्या विज्ञान खेळ आणि उपक्रमांविषयी माहिती उपलब्ध आहे.
      ऍस्ट्रोनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये गती असणा-या मुलांसाठी पुण्याच्या आयुकाचीwww.iucaa.ernet.in ही साईट उपयुक्त आहे. विज्ञानाचा प्रसार आणि सोपी विज्ञान खेळणी तयार करणा-या अरविंद गुप्तांची साईट www.vidyaonline.org खजिना आहे. विविध गोष्टींच्या पुस्तकांबरोबरचUNESCO ने मुलांसाठी तयार केलेले ७०० विज्ञान प्रयोंग डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ह्या साईटवरच्या लिंक्स वैयक्तीक वापरासाठी मोफत उपलब्ध आहेत.
      इंटरनेटवरच्या साईटसवर अनेक 'रिसोर्स' साईट्स उपलब्ध आहेत. महत्त्वाचे आहे की त्या कितपत आणि कश्यारितीने मुलांपर्यंत पोहोचतात, ह्या विषयी विक्रम साराभाई सायन्स सेंटरचे कार्तिकेय साराभाई ह्यांचा अनुभव डोळे उघडवणारा आहे. कार्तिकेय आणि त्यांचा चमू अहमदाबाद येथील राजोडा गावात मुलांना गणित आणि विज्ञान शिकवायला जात असत. त्यावेळेला त्यांनी २५X५ असे साधे गणित मुलांना सोडवायला दिले. काही मुले चुकणार ह्याचा त्यांना अंदाज होताच. वर्गाची उत्तरे १२५, ३०, ४५, १०५ अश्या गटात मोडणारी होती. त्यापैकी त्यांनी ३०, ४५, १०५ उत्तरे देणा-या गटांचे विश्लेषण करायचे ठरवले. ३० उत्तर लिहिणा-या गटाने दोन्ही अंकांची बेरीज केली होती.
      ४५ वाल्यांनी पाचाने पाचाला गुणले परंतु पाचाने दोनालाही गुणावे लागेल हे माहिती नसल्यामुळे दोन आणि हातचे दोन ह्यांची बेरीज करुन मोकळे झाले. १०५ उत्तर काढणा-या मुलांनी गुणाकार बरोबर केला परंतु दहा संख्येत दोन मिळवायचे विसरुन गेले. त्याविषयी शिक्षिकेशी चर्चा केल्यास कळले की गणित परत समजावून सांगण्यापेक्षा पाढे पाठांतरावर अधिक भर देण्यात येतो. त्यामुळे गणिताची 'शास्त्रीय' पध्दती मुलांपर्यंत न पोहोचता पाठांतरावर अधिक भर होता. ह्यासाठी मुले दोषी नाहीत तर शिक्षक आणि पालकांनी आपण मुलांपर्यंत काय 'कम्यूनिकेट' करत नाही आहोत ह्यांची नोंद घ्यायला पाहिजे. अश्या अनेक विज्ञान आणि पर्यावरण संबंधी माहिती, उपक्रम आणि प्रकल्पांविषयी www.greenteacher.org ह्या साईटवर वाचता येते.

विज्ञानाचे गूढ जाणून घेण्यासाठी इंटरनेट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. म्हणून म्हणतात -

Friday, October 7, 2016

रावेर येथे विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा सपन्न

आज दि. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्य.) अंतर्गत शिक्षण विभाग, रावेर, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर व रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर यांच्या वतीने रावेर तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या विज्ञान शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यात तालुक्यातील इ. ९ वी व १० वी ला विज्ञान विषय शिकवणार्‍या ४३ शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. In this Workshop Excel Use In Education, Lab Demonstration, & Power Point Presentation याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.




















 

Friday, September 23, 2016

इ. ९ वी व १० वी च्या प्रयोगशाळा साहित्याच्या संदर्भात सभेबाबत

सर्व तालुका समन्वयकांना कळविण्यात येते की दि. २६/०९/२०१६ सोमवार रोजी मा. शिक्षणाधिकारी कार्यालयात इ. ९ वी व १० वी च्या प्रयोगशाळा साहित्याच्या संदर्भात सभा आयोजीत केली आहे तरी आपण सोमवारी ठीक १०.०० वाजता उपस्थित राहावे, तसे उपस्थितेचे पत्र सर्व तालुका समन्वयकांच्या यादीसह तालुक्यांच्या मा. गटक्षिकक्षणाधीकरी कार्यालयात पाठवले आहे. 

प्रताप विद्या मंदिर, चोपडा या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१६ व राज्य स्तरीय नाट्यत्सव स्पर्धा २०१६ निवड झाली आहे तेथील विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांचे जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन.



Thursday, September 15, 2016

World Ozone Day: OZONE AND CLIMATE: RESTORED BY A WORLD UNITED

The theme for the 2016 International Day for the Preservation of the Ozone Layer to be marked on 16 September is: Ozone and climate: Restored by a world united
The theme is complemented by the tagline: Working towards reducing global-warming HFCs under the Montreal Protocol
The theme for this year's International Ozone Day recognizes the collective efforts of the parties to the Vienna Convention and the Montreal Protocol towards the restoration of the ozone layer over the past three decades and the global commitment to combat climate change. 
As a result of concerted international efforts, the ozone layer is healing itself and is expected to recover by the middle of this century. In addition, the Montreal Protocol has significantly contributed to the mitigation of climate change by averting the emission of more than 135 billion tonnes of carbon dioxide equivalent into the atmosphere by simply phasing out ozone-depleting substances.
Additionally, as mandated by the "Dubai Pathway on Hydrofluorocarbons (HFCs)" adopted in 2015, parties are working within the Montreal Protocol to an HFC amendment in 2016 by first resolving challenges by generating solutions in the contact group on HFCs. According to scientific information, reducing HFCs under the Montreal Protocol can avoid 0.5°C of global warming by the end of the century, while continuing to protect the ozone layer
.

Below are the 32 Best Ozone Layer Slogans. Share them with your friends.

  • Ozone today, Oxygen tomorrow
  • Earth without ozone is like a house without roof
  • Ozone-not just a layer but a protector
  • Deal today with Ozone for a Better tomorrow
  • Prevent skin cancer – Protect the ozone layer!
  • Ozone, Ozone, Don’t go away. We want you today
  • Every ozone hole is a threat to our soul
  • Life depletes when Ozone Depletes… So to save life save Ozone
  • Save Ozone; save earth
  • Leave the ozone and it will let you live
  • Ozone now, Oxygen later
  • Act as a whole to prevent the hole
  • Save nature, make future
  • Save the layer, which is Up in the air
  • Ozone, sit tight, coz now we’re on a fight
  • Ozone is harmful to health but layer is good
  • Ozone and Carbon Monoxide makes Carbon Dioxide and Oxygen
  • Make love not Ozone
  • Vote for controlling gases harmful to Ozone layer
  • Regulate gasses that harm Ozone layer
  • Preserve Ozone layer, it protects us
  • Preserve our Ozone layer
  • Save the ozone layer from depleting by implementing Ecofriendly methods
  • Ozone Layer Destroyed = There is no clear Skies
  • Ozone Layer the UV Blocker
  • Preserve our Ozone layer
  • Ozone – nature’s sunscreen
  • Don’t bust up nature’s threesome–O3
  • Please spare the already depleted OZONE layer
  • Ozone is for the birds (and other living things)
  • I Love the Ozone Layer
  • Keep calm & fight for Ozone layer

जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रयोगशाळा अद्ययावत व सुसज्य करणेबाबत




Tuesday, August 23, 2016

विज्ञान गीत

विज्ञान गीत
नव्या युगाचे नविन पंख लावून सारे उडुया
विज्ञानाची कास धरुनी हे जीवन फुलवूया
नव्या युगाचे नविन पंख हे, सायन्स सायन्स.......धृ
थोडा विचार करूया सारे, फळ खाली पडतेच का?
स्विच ऑन केल्यावर मग दिवा पेटतो क्षणात का?
थोडी बुद्धी चालवा, डोके तुमचे खाजवा 
न्यूटन, आइनस्टाईन मित्रांनो तुमच्यातच दडला
नव्या युगाचे नविन पंख हे, सायन्स सायन्स....... १
इंटरनेट जेव्हा आले, जग सारे जवळ आले
हालचाली मग जगातील सार्‍या कडू लागले वारे
या दुनियेत न जादू , आहेत ढोंगी साधू 
सार्‍यांमागे दडले विज्ञान तेच या आपण शोधू
नव्या युगाचे नविन पंख हे, सायन्स सायन्स....... २

-सूजिनकुमार एन. कंसारा
श्री. बालाजी प्राथ. विद्यालय, पारोळा जि. जळगाव
मो. नं - ९८५०९७९९२२

Monday, August 22, 2016

Jalgaon District INSPIRE Award Result



विज्ञान प्रदर्शनाचा विषय २०१६-१७

The theme for SLSMEE-2016-17 and JNNSMEE-2017,
“Science, Technology and Mathematics for Nation Building” aims to cover subthemes such as- 

1. Health; 

2. Industry; 

3. Transport and Communication; 

4. Innovations in renewable resources for sustainable environment; 

5. Innovations in food production and food security;

 6. Mathematical solutions in everyday life (Sub-themes listed above are