Pages

विज्ञान नट्योत्सव (विज्ञान नाटिका )

विज्ञान नट्योत्सव
राष्ट्रीय संग्रहालय परिषद (भारत सरकार) नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी विज्ञान नट्योत्सव विविध स्तरावर आयोजित करण्यात येतो. 
उपक्रमाचा हेतू : विज्ञान नट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे, आणि मनोरंजांनातून समाज प्रभोधन व्हावे या हेतूने दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो.
उपक्रम आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना :
अ.क्रं.
उपक्रमाचा स्तर
संभाव्य कालावधी
स्तरनिहाय विज्ञान नाट्य निवड संख्या
तालुकास्तर
ते १० ऑगस्ट
०२ जिल्हयाकरिता
जिल्हास्तर
१० ऑगस्ट ते १० सप्टेंबर
०२ विभागकरिता
विभागस्तर
१० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर
०१ राज्याकरिता
राज्यस्तर
ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर
०२ झोनल करिता
दरवर्षी विज्ञान नट्योत्सवाच वेगळा विषय ठरविण्यात येतो. जिल्हास्तरावरील विज्ञान नाट्यस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याकडे असते. व त्यांच्या नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक/क्षेत्रीय अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतात. प्रत्येक जिल्ह्यात तालुकस्तरावर सुद्धा विज्ञान नट्योत्सवाचे आयोजन १ ते १५ ऑगस्ट दरम्यान  करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यातून विभाग स्तरासाठी दोन विज्ञान नाट्य चमू (संघ) निवडण्यात येतात. विभागस्तरावरून प्रथम क्रमांक आलेल्या केवळ  एका विज्ञान नाट्य चमू (संघ) ला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येतो. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर मध्ये करण्यात येते.
तालुका, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेसाठी नियम व अटी : 
१. भाग कोण घेवू शकतो : शाळेत नियमित शिकणारे ( इयत्ता ६ वी ते १० वी )  विद्यार्थी
. विज्ञान नाट्य पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी : अर्धा तास (३० मिनिटे) विज्ञान नाट्य हे हिंदी, मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासन मान्य भाषेतून सादर करता येते. विज्ञान नाट्य हे दिलेल्या विषय/उपविषय यावर आधारित असणे आवश्यक आहे. विज्ञान नाट्याच्या एका चमूत (संघात ) ८ पात्र विद्यार्थी/विद्यार्थीनी सहभागी होवू शकतात.
३. पंच : विज्ञान नाट्याचे परीक्षण करण्यासाठी ३ पंच असतात. ते महाविद्यालय, विद्यापीठ किंवा संशोधन विभाग यांमधील व्यक्ति असतात. विज्ञान नाट्य स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील.
४. विज्ञान नाट्य मूल्यमापन निकष :
अ. नाट्याचे सादरीकरण  - ५० गुण
ब. नाट्यातील वैज्ञानिक माहिती   - ३० गुण
क. विज्ञान नाट्यातील परिणाम कारकता - २० गुण
                                                      एकूण गुण  =  १०० गुण
५. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी मार्गदर्शक शिक्षकांची संख्या : कमाल दोन (०२)
६. नाट्य मंचावर इतर व्यवस्था, ध्वनी प्रक्षेपण, प्रकाश योजना, वेशभूषा, संगीत, नृत्य इत्यादि बाबी नाट्याच्या प्रभावी सदरीकरणासाठी संबंधित नाट्य चमूला स्वत: करावी लागते.

4 comments: