Pages

विज्ञान प्रदर्शन

एन.सी.ई.आर.टी.(NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी संपूर्ण भारतात विज्ञान प्रदर्शन घेण्यात येते.
योजनेचे स्वरूप : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली हि संस्था १९७१ पासून  तालुकास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजित करते. सन १९८८ पासून या प्रदर्शनाचे नाव जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित व पर्यावरणीय प्रदर्शन असे करण्यात आले. डिसेंबर २०१६ च्या पहिल्या आठवड्यात तालुका स्तरावर सर्व तालुक्यामधून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते.
डिसेंबर अखेर जिल्हा स्तर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन होत असते व जानेवारी २०१७ च्या १५ तारखे पर्यंत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येते.
सहभाग : मान्यताप्राप्त शाळेतील पुढील दोन गटातील विद्यार्थी 
१) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) 
२) माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी ) 
असे दोन गटातील विद्यार्थी सहभागी होतात.या व्यतरिक्त खालील प्रदर्शन भरविले जातात
Ø माध्यमिक शिक्षकांचे(इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा
Ø प्राथमिक शिक्षकांचे(इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा
Ø प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा

व्याप्ती : या विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा सहभागी होतात १) शासकीय २)माजी शासकीय जिल्हा परिषद ३) महानगर पालिका/नगर पालिका/नगर परिषदेच्या शाळा, ४) खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शासन मान्य शाळा ५) मिशनरी शाळा ६) आश्रम शाळा इत्यादी प्रकारच्या शाळा होय.
प्रदर्शन कालावधी :
अ. क्रं
विज्ञान प्रदर्शनाचा स्तर
संभाव्य कालावधी
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन
१ ते ३० नोव्हेंबर
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
१ ते १५ डिसेंबर
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
११ ते ३१ जानेवारी

मूल्यमापन :

अ. क्रं.
मूल्यमापनाचे निकष
गुण
सहभागी विद्यार्थ्याची सृजनशिलता व कल्पनाशक्तीचा सहभाग
२० गुण
प्रार्शनीय वस्तूची मौलिकता व वैज्ञानिक आणि गणितीय नाविन्यता
१५ गुण
वैज्ञानिक विचार तत्व, उपागम (प्रणाली)
१५ गुण
तांत्रिक कौशल्य, कारागिरी, शिल्पकौशल्य
१५ गुण
समाजासाठी उपयोगिता, मापनीयता
१५ गुण
अल्पखर्चीक, हस्तवाहयता, टिकाऊपणा
१० गुण
सदरीकरणाचे पैलू जसे प्रयोग दिग्दर्शन, स्पष्टीकरण आणि प्रदर्शन
१० गुण
एकूण
१०० गुण

1 comment:

  1. Thanks for sharing such amazing information, it is very Beautiful.
    Aubrey

    ReplyDelete