आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञान आणि
तंत्रज्ञान क्रांतीने जगाला चारही बाजूने वेढलेले आहे. आज पूर्वी जे अशक्य वाटायचे
ते आता विज्ञानाने शक्य आणि सहजशक्य झाले आहे. हे विज्ञानच मानवाच्या
उत्क्रांतीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. असे हे विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचावे, यासाठी काही विज्ञानप्रेमींनी एकत्र येऊन सुरू केलेली संस्था म्हणजे जळगाव
जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ होय. समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींमध्ये
विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करणे या उद्देशाने जळगाव जिल्हा विज्ञान
अध्यापक मंडळाची सुरवात सन 2008-09 मध्ये करण्यात
आली.
उद्दिष्टे
· जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांशी सतत संपर्क
ठेवून वैज्ञानिक योजनांचा लाभ घेण्यास चालना देणे.
· विज्ञान प्रदर्शन, विज्ञान
मंच, विज्ञान मेळावा, इन्सपायर
अवॉर्ड व विज्ञानविषयक उपक्रमाची माहिती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत विविध माध्यमांतून पोहचविणे.
· विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे.
· शिक्षकांच्या भविष्यातील विज्ञान विषयक
संशोधांनाला मदत करणे.
सभासद :
जळगाव जिल्ह्यात मंडळाचे पाचशेहून अधिक सभासद आहेत. तसेच जिल्ह्यात
सर्व १५ तालुक्यात तालुका विज्ञान अध्यापक मंडळे कार्यरत आहेत.
मंडळामार्फत राबविले जाणारे उपक्रम :
विज्ञानाचे जीवनातील
महत्त्व वाढवणे आणि समाजाची वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे, याकरिता या तालुका विज्ञान अध्यापक
मंडळांकडून निर्देशित केलेले तसेच अनेक शहरी तसेच ग्रामीण भागांत विविध उपक्रम
वर्षभर घेतले जातात. उदा. व्याख्याने, परिसंवाद, संस्थाभेटी, वैज्ञानिकचर्चा, मार्गदर्शन,
कार्यशाळा, पोस्टरप्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, रॉकेट लोंचिंग व माडेलिंग वगैरे
कार्यक्रम घेतले जातात केले जातात. तसेच दैनंदिन जगण्याशी संबंधित असे अनेक मार्गदर्शनपर
कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.
मंडळाचा लोगो
No comments:
Post a Comment