Pages

विज्ञान मंच (इयत्ता ९ वी साठी)

विज्ञान मंच  योजना 

राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, नागपुर यांच्या तर्फे दरवर्षी विज्ञान मंच योजना राबविण्यात येते 
अ) विज्ञान मंच केंद्र : विज्ञान मंच केंद्रासाठी अ व ब गट निर्धारण करण्यात येतात.
अ गट : विज्ञान मंच कार्यरत असणार्‍या शहराच्या स्थानिक परिसरातील शाळा.
ब गट : अ गटाचे क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित शाळा.
या दोन्ही गटाची विज्ञान मंच प्रवेश पूर्व परीक्षा साधारण सप्टेंबर महिन्यात घेण्यात येते.
ब) विज्ञान मंच प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया :
१. विज्ञान मंच प्रवेश परीक्षेकरिता इयत्ता ८ वी उत्तीर्ण झालेले व इयत्ता ९ वी शिकत असलेले (सन २०१२-१३ पासून) झालेले विद्यार्थी बसू शकतात. प्रवेश पूर्व परीक्षेसाठी  मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेतील जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांची निवड करता येते.
२. प्रत्येक जिल्ह्यातील अ गटासाठी १८० व ब गटासाठी १२० विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेसाठी केली जाते.
३. विज्ञान मंच प्रवेश परीक्षेमधून अ गटासाठी गुणानुक्रमे ४० व ब गटासाठी ३० अशा एकूण ७०  विद्यार्थ्यांची ७ दिवसीय मोफत शिबिरासाठी केली जाते. दोन्ही गटांसाठी प्रत्येकी १० विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येते.
४. या परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात येते. तसेच परीक्षेची पूर्व तयारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अनुदानित माध्यमिक शाळांना ५ विद्यार्थ्यांची नावे बोलविण्यासाठी स्पष्ट व सर्विस्तर परिपत्रक पाठविण्यात येते.
.............................................................................................................................................

(माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांची नावे पाठविण्याचा नमूना )

शाळेचे नाव : ........................................................................................................................... 

अ. क्रं.
विद्यार्थ्याचे नाव
एकूण गुण
टक्केवारी
शेरा
(गणित व विज्ञान विषयात ६५% पेक्षा जास्त गुण असलेले (गुणानुक्रमे)
1




2




3




4




5




विज्ञान मंच प्रवेश चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका फक्त मराठी व इग्रजी माध्यमातून असते. ही प्रश्नपत्रिका मानसिक क्षमता कसोटी व शालेय प्रविन्यता कसोटी अशा दोन भागात विभागलेली असते. प्रत्येक प्रश्नासामोर त्या प्रश्नाची चार संभाव्य उत्तरे दिलेली असतात त्यातील योग्य उत्तराचा क्रमांक प्रश्नासामोरील दिलेल्या कंसात लिहायचा असतो.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप :
मानसिक क्षमता          २० गुण २० प्रश्न
शालेय प्रविन्यता कसोटी (गणित )                               १५ गुण  १५ प्रश्न
सामान्य विज्ञान (भौतिक, रसायन, जीवशास्त्र)                 ४५ गुण ४५ प्रश्न
इंग्रजी                                                               १० गुण १० प्रश्न
सामान्य ज्ञान                                                     १० गुण १० प्रश्न
                                                            एकूण १०० गुण          १०० प्रश्न
ड) परीक्षा शुल्क आकारणी :
परीक्षेचा खर्च भागविण्यासाठी प्रवेश परीक्षेस बसणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याकडून रु ३०/- एवढे नाममात्र शुल्क आकारले जाते.

4 comments: