केंद्र
सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचा INSPIRE
(Innovation in Science pursuit for Inspired Research) हा इयत्ता ६ वी ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता
शिक्षण व संशोधनासंबंधीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य
हेतू प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शालेयस्तरापासूनच विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे
आकर्षित करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान यामधील संशोधन व विकास यासाठी त्यांना
सक्षम करणे असा आहे. याची अधिक माहिती घेऊया आजच्या आलेख मध्ये...
• 'इन्स्पायर' या कार्यक्रमाचे पाच अंगभूत असून यापैकी 'इन्स्पायर अवॉर्ड मानक' हा पहिला भाग आहे.
• 'इन्स्पायर अवॉर्ड मानक' ही योजना प्रत्येक शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी मधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांशी निगडीत आहे.
• 'इन्स्पायर अवॉर्ड मानक' ही योजना प्रत्येक शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी मधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांशी निगडीत आहे.
• या योजनेद्वारे शालेय
स्तर पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्यांमधील प्रज्ञेस (Talent) अधिकृत मान्यता/ओळख देण्यात येते.
• 'इन्स्पायर अवॉर्ड मानक' या योजनेत दरवर्षी २ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकरकमी 10 हजार रुपये 'ऍवॉर्ड' प्रमाणपत्रासह देण्याची केंद्र शासनाने
तरतूद केलेली आहे.
• या योजनेकरिता प्रत्येक
शाळेतील २ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना 'इन्स्पायर
ऍवॉर्ड' देण्यात येणार असून यासाठी शाळेच्या
मुख्याध्यपकांनी इयत्ता ६ वी ते १० वी मधील २ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड
गुणवत्तेच्या निकषावर करावयाची आहे.
• यासाठी वेगळे निकष
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने निश्चित केलेले नाहीत.
• प्रत्येक शाळेने इयत्ता ६
वी ते ८ वी मधील प्रत्येकी एक विद्यार्थी याप्रमाणे तीन विद्यार्थ्यांपैकी एका
विद्यार्थ्याची तसेच इयत्ता ९ वी, १० वी मधील प्रत्येकी
एक याप्रमाणे दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याची म्हणजेच प्रत्येक शाळेतून
दोन विद्यार्थ्यांची 'इन्स्पायर ऍवॉर्ड' साठी शिफारस करावयाची असून याबाबतचा प्रस्ताव Online करावयाचा आहे.
• या योजनेत इयत्ता ६ वी ते
१० वी पर्यंत वर्ग असणार्या प्रत्येक शासनमान्य माध्यमिक शाळांचा (सर्व
व्यवस्थापनाच्या/ माध्यमाच्या/अनुदानित/ विना अनुदानित) आणि इयत्ता ६ वी, ७ वी चे वर्ग असणार्या उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
• प्रत्येक शासनमान्य
शाळेने विहीत प्रपत्रातील प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक
यांच्याकडे सादर करावयाचा आहे. विहीत प्रपत्र शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रत्येक शाळेस उपलब्ध होणार आहे.
• या योजनेत विद्यार्थ्यांस
एकवेळ एकरकमी १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार असून यापैकी ५० टक्के रक्कम
विज्ञान प्रकल्प/विज्ञान प्रतिकृती तयार करण्यासाठी आणि उर्वरित ५० टक्के रक्कम
जिल्हास्तरीय प्रदर्शनात आपली प्रदर्शनीय वस्तू (विज्ञान प्रकल्प/प्रतिकृती)
मांडण्यासाठी वापरावयाची आहे.
• यामध्ये त्याचा प्रवासाचा
खर्च समाविष्ट आहे.
• या योजनेसाठी प्रत्येक
शाळेने सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे निवड केलेल्या विद्यार्थ्यांना
पारितोषिकांची रक्कम राज्य समन्वय अधिकार्यामार्फत विद्यार्थ्याला त्याच्या अकाऊंट मध्ये पाठविण्यात येईल.
• बँकेतून पारितोषिकाची
रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांस बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
• आवश्यक माहितीसाठी
संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांनी आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
तथा जिल्हा समन्वय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
• अधिकच्या माहितीकरिता
संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण
संस्था, रविनगर, नागपूर)
(दूरध्वनी क्रमांक ०७१२/२५६२९८९)
Congratulation sir we proud of u .... vidnyanshikshkansathi upukt mahiti...
ReplyDeleteथॅंक्स सर
ReplyDeleteSchool password aathwat nasel tar Kay karave
ReplyDelete