Pages

Thursday, December 31, 2015

International Year of Pulses 2016


The 68th UN General Assembly declared 2016 the International Year of Pulses (IYP) (A/RES/68/231)
The Food and Agriculture Organization of the United Nations (FAO) has been nominated to facilitate the implementation of the Year in collaboration with Governments, relevant organizations, non-governmental organizations and all other relevant stakeholders.
The IYP 2016 aims to heighten public awareness of the nutritional benefits of pulses as part of sustainable food production aimed towards food security and nutrition. The Year will create a unique opportunity to encourage connections throughout the food chain that would better utilize pulse-based proteins, further global production of pulses, better utilize crop rotations and address the challenges in the trade of pulses.

What are pulses and why are they important?

Pulses are annual leguminous crops yielding between one and 12 grains or seeds of variable size, shape and colour within a pod, used for both food and feed.  The term “pulses” is limited to crops harvested solely for dry grain, thereby excluding crops harvested green for food, which are classified as vegetable crops, as well as those crops used mainly for oil extraction and leguminous crops that are used exclusively for sowing purposes (based on the definition of “pulses and derived products” of the Food and Agriculture Organization of the United Nations).
Pulse crops such as lentils, beans, peas and chickpeas are a critical part of the general food basket.  Pulses are a vital source of plant-based proteins and amino acids for people around the globe and should be eaten as part of a healthy diet to address obesity, as well as to prevent and help manage chronic diseases such as diabetes, coronary conditions and cancer; they are also an important source of plant-based protein for animals.
In addition, pulses are leguminous plants that have nitrogen-fixing properties which can contribute to increasing soil fertility and have a positive impact on the environment.
The IYP website will be the main platform to share information and relevant resources with different partners. The current version will be updated soon, please come back for more information.

Monday, November 30, 2015

जागतिक एड्स दिन….


१ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो! एड्सहा शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा, मात्र हा रोग सोपा नाही. कुणाला ह्या रोगाची लागण झाली असे साधे माहिती जरी पडले तरीही अंगावर काटे उभे राहतात. पूर्वी कर्करोग हा सर्वांत भयानक रोग मानला जाई, मात्र एड्सह्या रोगाचा शोध लागल्यानंतर त्यालाच सर्वांत भयंकर रोग मानले जाऊ लागले. कर्करोगावर आता इलाज निघालेत. चांगले उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कर्करोग बराही होऊ शकतो. मात्र, १९८१ साली एड्सच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर आजतागायत ह्या रोगावर इलाज, औषध, लस किंवा हा रोग पळवून लावणारी उपचारपद्धती यांचा शोध लागला नाही. काही लोक तसा दावा जरी करत असले तरी त्यामागील सत्यता अजूनही बाहेर आलेली नाही.
हा रोग मुख्यतः चार कारणांमुळे होतो.
१) HIV बाधित रूग्णाला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई वापरल्याने
२) HIV बाधित व्यक्तीचे रक्त दुसऱ्या रुग्णाला दिल्याने
३) HIV बाधित गरोदर महिलेपासून तिच्या होणाऱ्या बाळाला आणि
४) असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे.

        यातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कारणांमुळे एड्स होण्याचे प्रमाण आता नगण्यच उरले आहे. कारण जवळ-जवळ सर्वच दवाखाने आणि रक्त संकलन करणारी केंद्रे आपले कर्तव्य चोख निभावतांना दिसतात. प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन देतांना सुई एकतर बदलली जाते किंवा ती गरम पाण्यात उकळवून निर्जंतुक केली जाते. आणि रक्त संकलन करणारी केंद्रे संकलित केलेल्या रक्ताच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या खेरीज रुग्णाला रक्त देत नाही. तसेच गरोदर महिलेची HIV तपासणी करून योग्य खबरदारी घेतल्याने तिच्या बाळाला होणारी लागण टाळता येऊ शकते. त्यामुळे एड्स होण्याचे प्रमाण चौथ्या कारणामुळेच अधिक आहे.
      ठराविक वयानंतर लैंगिक भावना उत्पन्न होणे काही गैर नाही. मात्र, त्या शमविण्यासाठी असुरक्षित संबंध ठेवणे जीवाला धोकादायक ठरू शकते. अशा संबांधावेळी काही रोगफैलाव रोखणाऱ्या साधनांचा वापर करून एड्सचा फैलाव रोखला जाऊ शकतो, मात्र त्याचीही शंभर टक्के हमी देता येत नाही. म्हणून अशा संबंधांपासून दूर राहणेच हितावह ठरते.
      मात्र, ह्या चार कारणांव्यतिरिक्त इतर कारणाने एड्स होतो असे मानणे पूर्णतः चुकीचे आहे. हा रोग संसर्गजन्य नाही. म्हणून एड्सबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्यासोबत हस्तांदोलन केल्याने, सोबत जेवण केल्याने हा रोग होत नाही. म्हणून एड्स बाधित रुग्णांना वाळीत टाकू नये. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे काही दिवस उरलेले असतांना त्यांना वाळीत टाकून आपण त्यांचे ह्या आजाराला तोंड देण्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरणच करतो. याव्यतिरिक्त आपण त्यांच्याशी सौदार्हाचे, स्नेहाचे संबंध ठेवले तर त्यांचे अखेरचे दिवस सुखात निघून जातील. काही शाळांमधून एड्स बाधित विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मज्जाव केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, अशा घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून पूर्णतः चुकीच्या आहेत.
       एड्स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र असे म्हणून गाफील राहून चालणार नाही. म्हणूनच वरील माहिती कित्येकांना ठाऊक जरी असली तरीही तुमच्यासमोर प्रस्तुत करणे महत्वाचे वाटले!
सतर्क रहा ! सुरक्षित रहा !

Sunday, November 8, 2015

जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


Thursday, November 5, 2015

हायड्रोजन

(अणुक्रमांक: १) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्‍या चिन्हाने दर्शवितात.सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात.
गुणधर्म
१.००७९४ ग्रॅ/मोल एवढा अणुभार असणारे उदजन हे सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे. विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्‍या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकपासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. इलेक्ट्रॉलिसिस पद्धतीने पाण्यापासूनही उदजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून उदजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.उदजनच्या सर्वात जास्त आढळणाऱ्या समस्थानिक अणूत एक प्राणु असतो आणि त्यात न्यूट्रॉन नसतात. ह्यास प्रोटियम असे म्हणतात. उदजन बहुतांशी मूलद्रव्यांबरोबर संयुग तयार करू शकतो, आणि बहुतांशी अतिशुद्ध संयुगांचा तो घटक असतो. आम्ल-अल्कली यांच्या रसायनशास्त्रात उदजनची प्रमुख भूमिका असते. त्यामधील बऱ्याच रासायनिक प्रक्रियांमधे रेणूंमधील प्राणु कणांची देवाणघेवाण उदजनच्या अणुकेंद्रातील प्राणुच्या स्वरूपात होते.
रासायनिक गुणधर्म
अनेक धातू उदजनच्या शोषणामुळे ठिसूळ होत असल्याने उदजनचे विद्रवण आणि शोषण ह्यांचे गुणधर्म धातुशास्त्राच्या, आणि त्याला सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. उदजन वायू संक्रमणी धातूंमधे व विरळा मृद्धातूंमधे अतिशय सहज विरघळू शकतो. तसेच तो स्फटिक धातूंमधे व अस्फटिक धातूंमध्येही विरघळतो. उदजनची विरघळण्याची क्षमता ह्या धातूंच्या स्फटिकांच्या जालातील स्थानिक विकृती आणि अशुद्धतेमुळे वाढते.
ज्वलन
हवेमध्ये उदजन अतिशय जलदपणे पेट घेऊ शकतो. मे ६, इ.स. १९३७ चा हिंडेनबर्ग अपघात त्यातील उदजनने असा जलद पेट घेतल्याने झाला.
उदजन वायू इतका ज्वलनशील असतो की एकूण हवेमध्ये तो ४ टक्के इतका कमी असला तरी पेट घेऊ शकतो. त्याच्या ज्वलनाची ऊर्जाशक्ती [श १०] २८६ किलोजूल/मोल एवढी आहे. उदजनच्या ज्वलनाचे रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे मांडता येते.
2 H2(g) + O2(g) → 2 H2O(l) + ५७२ किलोजूल (२८६ किलोजूल/मोल)
प्राणवायू बरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता उदजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. उदजन-प्राणवायूच्या ज्वाला अतिनील ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे उदजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते. बाजूच्या चित्रातील "हिंडेनबर्ग झेपेलिन" हवाई जहाजाच्या ज्वाला दिसत आहेत कारण त्याच्या आवरणातील कार्बन आणि पायरोफोरिक अ‍ॅल्युमिनियमच्या चूर्णामुळे त्या ज्वालांना वेगळा रंग आला होता.[५] उदजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक उदजनच्या आगीतून वाचले.
इतिहास
H2 चा शोध
H2 स्वरूपातील उदजन वायू पॅरासेल्सस  (इ.स. १४९३ - इ.स. १५४१) ह्या स्विस अल्केमिस्टने प्रथम तयार केला. त्याने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रयेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस उदजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती. इ.स. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने उदजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून उदजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला. इ.स. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने उदजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने उदजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण उदजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून उदजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. इ.स. १७८३ मध्ये आंत्वॉन लवॉसिए ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला उदजन असे नाव दिले.
सुरुवातीस उदजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H2 हा वायू सल्फ्यूरिक आम्ल आणि लोह ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात  असे.  हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H2च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू हेलियम हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.
पुंजवादाच्या इतिहासातील भूमिका
उदजनच्या अणूची रचना अतिशय साधी असते. त्याच्या अणुकेंद्रात फक्त एक प्राणु असतो व त्याभोवती एक विजाणू फिरत असतो. उदजन अणूच्या अतिशय साध्या रचनेमुळे आणि अणूपासून निघणाऱ्या व शोषल्या जाणाऱ्या प्रकाशपटलाच्या अभ्यासामुळे अणुरचनेचा सिद्धान्त बनवण्याच्या कामात उदजनची खूप मदत झाली. तसेच, उदजनचा रेणू H2 ह्याची व त्याचा कॅटआयन H2+ ह्याचीही रचना एकदम साधी असल्याने रासायनिक बंधाचे गुणधर्म पूर्णपणे समजून घ्यायलाही त्याचा उपयोग झाला. उदजन अणूचा पुंज-भौतिकी अभ्यास इ.स.च्या १९२० च्या दशकाच्या मध्यास झाला, त्यानंतर वरील सिद्धान्तांचाही विस्तार केला गेला.
     सुरुवातीस अभ्यासल्या गेलेल्या पुंज-भौतिकी परिणामांपैकी एक परिणाम मॅक्सवेलने, पूर्ण पुंज-भौतिकी सिद्धान्त मांडण्याच्या जवळजवळ अर्धे शतक अगोदर उदजन अणूच्या संदर्भातच लक्षात आणून दिला होता, पण त्या वेळेस त्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण सापडले नव्हते. मॅक्सवेलच्या निरीक्षणाप्रमाणे उदजनची विशिष्ट उष्णता क्षमता साधारण तापमानच्या खाली इतर द्वि-अणू वायूंपेक्षा बरीच वेगळी होती, आणि ती क्रायोजेनिक तापमानांना एक-अणू वायूंच्या उष्णता क्षमतेच्या जवळ जात होती. पुंजवादानुसार ही वर्तणूक उदजनच्या फिरणाऱ्या (पुंजित) ऊर्जा पातळींमधील अंतरामुळे झालेली आहे. उदजनच्या अतिशय कमी भारामुळे त्यातील ऊर्जा पातळ्या जास्तच दूर असतात. अधिक भारांच्या द्वि-अणू वायूंमध्ये ऊर्जा पातळ्या एवढ्या अलग नसतात, आणि त्यांच्यात वरील परिणाम पहायला मिळत नाही.
उपयोग
उदजन हे खनिज तेलापेक्षा ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्रोल दर लिटरमध्ये ४२००० बी. टी. यु.(ब्रिटिश थर्मल युनिट) तर द्रव उदजन दर लिटरला १,३४,५०० बी. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करतो. परंतु याच्या निर्मितीचा खर्च परवडत नसल्यामुळे उदजन हे प्रचलित साधन होण्यात अडचण येत आहे.
नामकरण

हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती प्राचीन ग्रीक भाषेतील हायडॉर (ग्रीक: ὕδωρ (हीद्र)) म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण 'आंत्वॉन लवॉसिए' ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने केले.

Wednesday, October 21, 2015


भास्कराचार्य

भास्कराचार्य : प्राचीन भारतातील महान गणितज्ज्ञ शास्त्रज्ञ म्हणून भास्कराचार्य ओळ्खले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रात सन १११४ मध्ये झाला त्यांचे वडील उत्कृष्ट गणितज्ज्ञ होते. त्यांचाकडेच त्यांनी गणिताचा श्रीगणेशा केला. आणि मग आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याच्या बळावर "भास्कराचार्य म्हणून नाव कमावले. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी म्हणजे सन ११५० मध्ये त्यांनी "सिद्धांन्त शिरोमणी" हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये चार भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये अंकगणिताचे ज्ञान आहे. हा भाग काव्यात्मक आहे. या भागाला त्यांनी आपल्या मुलीचे "लिलावती" असे नाव दिले. या भागाला "पाटी गणित" असेही म्हणतात. त्याकाळात वापरात असलेल्या वजनामापाच्या एककापासून सुरूवात करून त्यानंतर बेरीजवजाबाकीगुणाकारभागाकारवर्ग  वर्गमूळघन  घनमूळ इत्यादि प्रमुख वीस अंकगणितीय क्रियांविषयी सविस्तर माहिती दिली आहे
तसेच त्रिकोण, चौकोन, वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, कोन, पिरॅमिड्स, आदि भौमितिक आकृत्यांबाबतचे सिद्धांत त्यावरील सोपी व्यावहारिक उदाहरणे दिली आहेत. दुसरा भाग बीजगणिताचा आहे. त्यामध्ये धन ऋण चिन्हांची कल्पना मांडली आहे. याशिवाय शून्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. बीजगणिताची मांडणी सोपी सुटसुटीत करण्यात भास्कराचार्यांचा मोलाचा वाटा आहे. सिद्धांतशिरोमणीचे "महागणिताध्याय" "गोलाध्याय" असे आणखी दोन भाग असून त्यामध्ये भास्कराचार्यांनी ग्रह त्यांची गती, अवकाश आदिंची चर्चा केली आहे. दिवसापेक्षाही कमी कालावधीत सूर्याच्या स्थानात सतत बदल होत असतो हा बदल सर्व कालावधीत सारखाच असतो, हे त्यांनी दाखवून दिले.