National Science Day
विज्ञान अर्थात ‘सायन्स’हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते. असेच संशोधन भारतीय (Physicist) भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केले होते. त्यामुळे सबंध देशात आज (National Science Day) विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. (The Work of Researchers) संशोधकांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरावे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या अनुशंगाने सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था एवढेच नाही तर शास्त्रज्ञ आणि संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी ‘रामन परिणामा’चा शोध लावला होता. या त्यांच्या कार्याचा गौरव करीत 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीयच नव्हते तर अशिया खंडातील पहिले व्यक्ती होते. तेव्हापासून हा दिवस देशामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जात आहे.

No comments:
Post a Comment