Pages

अपूर्व विज्ञान मेळावा

                      अपूर्व विज्ञान मेळावा
अपूर्व विज्ञान मेळाव्याचे स्वरुप  व आयोजनाची पद्धत :
सर्व प्रथम आपण आपल्या शाळेवर शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करुन  त्यांचा मेळावा आयोजित करावा व त्यांच्यातील नाविण्यपूर्ण असे प्रयोग प्रत्येक वर्गातून निवडून तालुकास्तरावर सादर करावेत. आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना सदर अपूर्व मेळाव्यास भेट देण्यास नेऊन त्यांना निरीक्षण करण्याची संधी द्यावी. विज्ञानाच्या पुस्तकातील प्रत्येक घटकावर एखादी कृतीप्रयोगसाहित्यउपकरणमॉडेल तयार करावेत. उदा. हवेमध्ये 20 टक्के ऑक्सिजन असतो हा प्रयोग करण्यासाठी एका प्लेटमध्ये रंगीत पाणी घेऊन एक मेणबत्ती लावली व मेणबत्तीवर एक ग्लास उलटा ठेवला तर ग्लासमध्ये रंगीत पाणी वर चढते. आणि ग्लासच्या 1/5 एवढा भाग पाणी वर चढते. याचा अर्थ मेणबत्तीमुळे ऑक्सिजन वापरला गेला. जेवढा ऑक्सिजन वापरला गेला तेवढेच पाणी ग्लासमध्ये वर चढले. या पाण्याची टक्केवारी काढली तर ती 20 टक्के येते. 
या प्रयोगासाठी कोणताही खर्च नाही. कोणीही करु शकतो. असे छोटेमोठे प्रयोग मांडून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करु शकता. यासाठी 2-3 विद्यार्थ्यांचाही ग्रुप करु शकतो. माझी सर्व शिक्षकांना विनंती राहील की या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्या शाळेतील जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांना सहभागी करुन हा उपक्रम यशस्वी करावा. अपूर्व विज्ञान मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेगळी अनुभूतीप्रयोगाची संधीध्येयनिश्चितीचा मार्ग आणि म्हणूनच त्यासाठी ही चिमुकले विद्यार्थी सातत्याने धडपडत असतात. त्यातही महापालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी क्वचितच मिळतेपण आता त्याच विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रयोग राज्यस्तरावर पोहोचले आहेत.
गेल्या २५-३० वषार्ंपासून नागपुरातील महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा अपूर्व मेळावा आता राज्यभर राबवण्यात येणार आहे. गेल्या तीन दशकांपासून अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून महापालिकेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाच्या प्रयोगांमधील चुणूक शहरातील नागरिक बघत आहेत.
विज्ञान विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सहज म्हणून या मेळाव्याला भेट दिली आणि अपूर्व विज्ञान मेळावा त्यांच्या नजरेत भरला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुंपासून तयार केलेले विज्ञान मॉडेल्स आणि प्रयोग अभिनव असल्यामुळे त्यांनी राज्यात ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ३६१ तालुका आणि २६ महापालिकामध्ये असे एकूण ३८७ मेळावे अपूर्व विज्ञान मेळावे आता आयोजित केले जाणार आहेत. त्यादृष्टीने पूर्वतयारी म्हणून विज्ञान शिक्षकांसाठी नागपुरात दोन दिवसांची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून यात २०० नागरिक मेळावा पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठीसहभागी झाले आहेत. मेळाव्यातील प्रयोगाच्या सीडी आणि पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत आणि शिक्षकांना त्या देण्यात आल्या आहेत. सीडी आणि पुस्तकांचा संच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकाला भेट देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात तीन चमू तयार करण्यात आल्या आहेत.
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यजिल्हा विज्ञान पर्यवेक्षक व जिल्ह्यातील उत्साहीउपक्रमशिल विज्ञान शिक्षक यांचा समावेश आहे. राज्यातल्या ३७ जिल्ह्यात या चमूवर आयोजनाची जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला विभाग स्तरावर विज्ञान सल्लागार असणार आहेत. राज्यातील आठ शैक्षणिक विभागातील आठ विज्ञान सल्लागार या प्रशिक्षणासाठी आले आहेत. त्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाला मेळाव्याचे रूप दिले. नागपूर महापालिकेचे १२५ विद्यार्थी व ५० शिक्षक यात सहभागी झाले. प्रयोगाचे तत्त्व आणि चर्चादेखील याठिकाणी होणार आहे. राज्य विज्ञान संस्थेने स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी पारितोषिकेसुद्धा ठेवली आहेतअशी माहिती संचालक नारायण जोशी यांनी दिली. राष्ट्रभाषा भवनचे सुरेश अग्रवाल या सर्व उपक्रमात सहभागी आहेत. २८ फेब्रुवारीला आयोजित विज्ञान दिनानिमित्त राज्यात ४०० ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळावे आयोजित केले जाणार आहेत. ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक१२५ खिळे लावलेली पाटी व त्यावर बसणेपर्सिस्टन्स ऑफ व्हिजनहवेत २० टक्के ऑक्सिजन आहे हे दर्शविणारे असे ६०० ते ७०० प्रयोग या सीडीत आहे. हे सर्व प्रयोग बालटीपाणीसुईधागाबिसलेरी बॉटलचहाचे प्लॅस्टिकचे कप अशा टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून हे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगाची कारणमिमांसासुद्धा आहे. 


सन २०१६-१७

                                                      जा.क्रं/शिक्षण/गटशि/अविमे/२०१६-१७
प्रती,                                                   पंचायतसमिती कार्यालय,
मा. मुख्याध्यापक                                         दि.         /        /२०१६       
..................................................................................

      विषय : शाळास्तरावर दोन दिवसीय अपूर्व विज्ञान मेळावा २०१६-१७ चे आयोजन            
             करणेबाबत....
      संदर्भ : मा. शिक्षणाधिकारी (माध्य) जि.जळगाव यांचे पत्र क्रं. जा.क्रं  
             शिक्षण/सशिअ/सकाअ/२१६/२०१६ दिनांक १३/१२/२०१६

महाशय,
      वरील विषयांन्वे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विज्ञान व गणित विषयाच्या गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवणे व त्यांच्या सवर्धंनासाठी ABSL (Activity Based Learning) हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणिताची आवड निर्माण व्हावी. तसेच निरीक्षणाच्या माध्यमातून कृती व प्रात्याक्षिक यावर भर देवून विद्यार्थ्यांचे विज्ञान व गणित विषयाचे अध्ययन होणे आवश्यक आहे. याकरिता सन २०१६-१७ या सत्रात इ. ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन आपल्या शाळेत करण्यात यावे.
आयोजनासंबंधीची कार्यवाही खालील प्रमाणे
१. सर्वप्रथम आपण अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजनासाठी आपल्या शाळेतील उपक्रमशील, विज्ञाननिष्ठ शिक्षकाची निवड करावी.
२. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन दिनांक २० जानेवारी २०१७ पर्यन्त करण्यात यावे.
३. शाळास्तरावर मेळाव्याचे आयोजन करतांना मैदान, सभागृह, प्रयोगशाळा, संगणक इ. भौतिक सुविधांचा पुरेपूर वापर करावा.
४. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे प्रयोग अल्पखर्चीक असल्यामुळे सहज उपलब्ध होणार्‍या संसाधंनातून आयोजित करावे. अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या आयोजनासाठी आपली उपक्रमशीलता तसेच अन्य प्रतिष्ठान, लोक प्रतीनिधी, समाजातील दानशूर व विज्ञान प्रेमी लोकांची मदत आपणास घेता येईल.
५. अपूर्व विज्ञान मेळावा आयोजनाप्रसंगी हार, पुष्पगुच्छ, कार्यक्रम पत्रिका, स्वागत समारंभ इ. बाबी शक्यतो टाळाव्यात.
६. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे नियोजन करून नियोजनाची एक प्रत खालील तक्त्यात दिनांक        २०१६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत तालुका समन्वयक श्री
                            यांच्याकडे जमा करावी.
नियोजन अहवाल नमूना
शाळेचे नाव :
मुख्याध्यापकाचे नाव :
मोबाइल नंबर :
विज्ञान शिक्षकाचे नाव :
मोबाइल नंबर :
नियोजित अपूर्व विज्ञान मेळावा दिनांक :
मेळाव्यात सादर करण्यात येणार्‍या प्रयोगांची संख्या :
सहभागी विद्यार्थ्यांची संख्या :
आपल्या शाळेचा नियोजन अहवाल प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे जमा होणार असून मेळावा आयोजनाच्या दिवशी शाळेत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव/जिल्हा समन्वयक/तालुका गटशिक्षणाधिकारी/तालुका समन्वयक यापैकी भेट देतील.

७. सदर मेळाव्याचा आपल्या शाळेतील आयोजनाचा अहवाल तालुका समन्वयक यांच्याकडे २१ जानेवारी २०१७ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जमा करावा.

आयोजन अहवाल नमूना
शाळेचे नाव :
मुख्याध्यापकाचे नाव :
मोबाइल नंबर :
विज्ञान शिक्षकाचे नाव :
मोबाइल नंबर :
अ. क्रं.
सहभागी विद्यार्थ्याचे नाव
सादर केलेल्या प्रयोगाचे नाव
इयत्ता













  

                                                                   गटशिक्षणाधिकारी
                                                            गटसाधन केंद्र, ………..

No comments:

Post a Comment