Pages

Thursday, June 18, 2020

राज्यस्तरीय शैक्षणिक मंथन 2020

20 ते 22 जून तीन दिवसीय शैक्षणिक वेबिनार


सर्व पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांच्यासाठी तीन दिवसीय शैक्षणिक वेबिनार 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या वेबिनार चे उद्घाटन 20 जून ला दुपारी 4:00 वाजता शिक्षण राज्यमंत्री मा. ना. बच्चू कडू साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
1. सहभागी होणेसाठी खालील गुगल फॉर्म च्या लिंक द्वारे नोंदणी करावी. 
गूगल फॉर्म लिंक - https://forms.gle/c73qLSaNd15XfmnD6
2. नोंदणी केल्यानंतर टेलिग्राम च्या खालील लिंक द्वारे ग्रुप मध्ये सहभागी व्हावे. त्या ग्रुपवर इतर सूचना व ऑनलाइन मीटिंग बाबत कळवले जाईल.
टेलिग्राम ग्रुप लिंक -
https://t.me/joinchat/PFoMzhpnTWakjwhHoRpIWg
3.या शैक्षणिक वेबिनारचे तीनही दिवस लाईव्ह प्रक्षेपण
https://www.facebook.com/groups/jjvam या विज्ञान मंडळाच्या फेस बुक पेज वरून करण्यात येईल.
4. ३ दिवस सहभाग नोंदविणार्‍या व फीडबॅक फॉर्म भरणार्‍या सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
फीडबॅक फॉर्म ची लिंक - 
https://forms.gle/GsQNsQnemaCDGrKN9

Blog :  www.jjvam.blogspot.com
E-mail : jjvam12@gmail.com
Facebook Page : - https://www.facebook.com/groups/jjvam
YouTube Channel : -  https://www.youtube.com/channel/UCelUDrb9lnf6AtL_SVe9

Saturday, June 13, 2020

जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा 2020 निकाल

जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
जळगाव शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव 
आणि
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विपनेट क्लब (VP-MH039)
डॉ. सी. व्ही. रमन विपनेट क्लब (VP-MH004)
आयोजित
जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा 2020 निकाल
लहान गट (इयत्ता 6 वी ते 8 वी) 
प्रथम –  (S9) -  प्रणाली विजय वाघ - इंदिराबाई ललवानी माध्यमिक विद्यालय ' जामनेर 
द्वितीय - (S5) - हर्षल विनोद बारी - के नारखेड़े विद्यालय '  भुसावल 
तृतीय - (S8) - दर्शना दादू कापडे - पी आर हाइस्कूल - धरणगाव 
उत्तेजनार्थ  -  1) (S19) - अखिलेश नितिन भोम्बे - जे ई स्कूल मुक्ताईनगर
2) (S11) -  मधुरा दिनेश मोरे  - एस जी एस हाइस्कूल पाचोरा

मोठा गट (इयत्ता 9 वी ते 12 वी)
प्रथम – (L39) - रसिका मुकुंद ढेपे  - प न लुंकड़ कन्या स्कूल - जळगाव 
द्वितीय- (विभागुन)  1) (L9) -  मंथन कांतिलाल कुमावत  - ऐ बी बॉयज स्कूल -  चालीसगांव
2) (L15) - अपूर्वा राजेन्द्र अकोले  - सौ कमलाबाई सुंदरलाल अग्रवाल गर्ल्स हाइस्कूल , रावेर 
तृतीय - (L32) - ज्ञानदा शरद वसनकर  - इंदिराबाई ललवानी जूनियर कॉलेज, जामनेर
उत्तेजनार्थ - 1) (L20) -  इंद्रायणी उदयराव भोसले  - तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय , चालीसगांव
2) (L27) - विधान भरत पाटिल  - पंकज विद्यालय, चोपडा

Friday, June 5, 2020

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2020 नोंदणी

जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://forms.gle/Q1hphQYo3aCM2orj7

GOVERNMENT OF INDIA REG. NO. VP-MH0004 & VP-MH039
मार्च 2020 पासून आपण सर्व कोविड-19 च्या संकटाला तोंड देत आहे. या कोविड-19 ने आपल्या जीवनशैलीमद्धे अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. ही महामारी कधी संपेल माहीत नाही. म्हणून त्यासोबत जगण्याची सकारात्मकता घेवून आपली परंपरा जपून यावर विजय मिळवायचा आहे.

जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ,जळगाव
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , जळगाव
आणि
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विपनेट क्लब (VP-MH0039)
डॉ. सी. व्ही. रमण विपनेट क्लब (VP-MH0004)
आयोजित
जिल्हास्तरीय वक्तृत्व
स्पर्धा 2020

                                                                        

  
: दोन्ही गटांसाठी स्पर्धेचे विषय :
1. परंपरा जपूया कोरोनाला हरवूया
2. कोरोना इष्टापत्ती का दृष्टापत्ती?
3. आजीचा बटवा, कोरोनाला चकवा
                लहान गट  इ. 6 वी ते 8 वी        मोठा गट इ. 9 वी ते 12 वी
: स्पर्धेसाठी सुचना :
1. स्पर्धा ऑनलाइन आहे. स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही.
2. ऑनलाइन झूम APP द्वारे आपल्याला वरील कोणत्याही एका विषयावर भाषण द्यायचे आहे.
4.दोन्ही गटांसाठी स्पर्धेचे विषय सारखे आहेत.  लहान गटासाठी 3 मिनिटेमोठया गटासाठी 4 मिनिटाचा वेळ राहील
3. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी www.jjvam.blogspot.com या ब्लॉगवर जावून आपली नोंदणी करावी. नोंदणीची अंतीम दिनांक 8 जून 2020 आहे.    
4. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जातील.त्यांना स्मूर्तीचिन्ह व ई-प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र 
5. परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.
6. स्पर्धेची दिनांक व वेळ ग्रुप तयार करून त्यावर कळविण्यात येईल.
7. ही स्पर्धा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच आहे.
संपर्क : बी. बी. जोगी (9226709248), सुनिल वानखेडे (7588687955) , संदिप पाटील (7875925170)

Thursday, June 4, 2020

जागतिक पर्यावरण दिन 5 जून


जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. जागतिक पर्यावरण दिवस- 2009 या वर्षाची संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे. जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय जागतिक पर्यावरण दिन 5 जून

यांचे काटेकोरपणे पालन करणे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.
पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.