राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान योजनेतंर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव आयोजित तीन दिवशीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलीत शाररिक शिक्षण महाविद्यालयात आयोजन करण्यात आले.
सकाळी दहा वाजेला आयएमआर कॉलेजच्या प्रांगणातून ग्रंथ दिंडी व सजवलेल्या रथाची दिंडी सवाद्या काढण्यात आली. या दिंडीला माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांनी झेंडी देवून सुरूवात करण्यात आली. .यावेळी उपशिक्षणाधिकारी अरूण पाटील, विकास पाटील, सिध्दार्थ नेतकर मुख्याध्यापक संघाचे सचिव सी.डी.पाटील, जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष खंबायत व इतर मुख्याध्यापक, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष बी.बी.जोगी, सचिव सुनिल वानखेडे, सहसचिव एस.डी.पाटील, एस.आर.झांबरे, बी.आर. महाजन, गोपाळ महाजन आदि उपस्थित होते. या मिरवणुकीत लेझीम पथक नंदिनीबाई विद्यालयाचे, आर.आर. विद्यालयाचे बॅडपथक, विज्ञान रथ व पालखी सार्वजनिक विद्यालय, आसोदा यांचा सामावेश होता
जिल्हाभरात विज्ञानाच्या उपक्रमांची माहिती पोहचावी यासाठी विज्ञान उपक्रम माहिती पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तीकेमुळे वि्दयार्थ्यांना वर्षभरातील उपक्रमांची व त्यासाठी करण्यात येणाऱ्या गुणदानांची माहिती मिळणार आहे.
No comments:
Post a Comment