विज्ञान
किंवा Science हा विषय अत्यंत व्यापक आहे. Science हा शब्द मूळ लॅटीन शब्द scientiaपासून
तयार झाला. scientia चा अर्थ आहे "knowledge"
किंवा ज्ञान. विज्ञान हा प्रयत्न आहे ह्या जगातली आश्चर्य शोधण्याचा,
निरीक्षणाचा, समजून घेण्याचा आणि आपल्या
रोजच्या जीवनात त्याचा वापर करण्याचा. विज्ञानात अनेक उपविषय असून प्रत्येक
उपविषयाची व्यापकताही खूप मोठी आहे. आजच्या २१व्या युगात विज्ञानामुळेच तर आपले
जीवन सुखकर झाले आहे. शाळेत पहिली पासूनच सामान्य विज्ञान शिकायला सुरुवात होते.
स्वकृती आणि निरिक्षण पध्दतीपेक्षाही केवळ Inferences वर अधिक भर दिला जातो. त्यामुळे वरच्या
वर्गातूनही विद्यार्थी आपल्या निरिक्षणातून नोंदी करुन विषय समजावून घेण्यापेक्षा
पाठांतरावर अधिक भर देतांना दिसतात. कधी कधी विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष
करण्यापेक्षा फक्त समजावून घेतले जातात तर बरेच वेळेला प्रयोग करतांना ते अत्यंत 'मेकॅनिकल' पध्दतीने केले जातात.
विज्ञान शिकतांना नोंदी करणे, मूल्यमापन करणे, मोजणे, आखणे,
ग्राफ तयार करणे, वेळ मोजणे ह्या सगळ्या
गोष्टींना खूप महत्त्व असते. पण बहुतेक वेळा ह्या सुविधा विद्यार्थ्याकडे असतीलच
ह्याची खात्री नसते. ह्यासाठी http://www.learningscience.org ह्या साईटवर अत्यंत उपयुक्त
अशी असे 'टूल्स' डाऊनलोडसाठी
मोफत उपलब्ध आहेत. ह्यामध्ये मोजपटटी, कोनमापक, ग्राफपेपर, स्टॉपवॉच वगैरे पासून ते अगदी अद्यावत
गुगल इमेजिंग, गुगल मॅप्स आणि गुगल मार्सही आहेत. त्याच
बरोबर जीवशास्त्रात गती असणा-यांसाठी 'व्हर्चूअल
मायक्रोस्कोपही' आहे.
www.wonderwhizkids.com ही साईट तर म्हणते मुलांसाठी
निसर्ग हाच सर्वात मोठा 'प्रोजेक्ट' आहे. आपला राष्ट्रपक्षी असणा-या मोराचा पिसारा आपल्याला रंगबिरंगी दिसायचे
कारण म्हणजे त्याच्यातून परिवर्तीत होणारा प्रकाश होय. आपला मोराच्या पिसा-याकडे
बघण्याचा कोन बदलल्यास रंगछटाही वेगळ्या दिसतात. अश्या त-हेचे अनंत प्रश्न
प्रत्येक मुलाला पडतच असतात "आकाशाचा रंग निळाच का?" , "पृथ्वीवर ऋतू का असतात?" , "सुर्योदय आणि
सूर्यास्ताच्या वेळेला आकाशात तांबडाच रंग का असतो?" ... ह्या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या साईटवर वाचायला
मिळतात. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावरही साईट प्रकाश टाकते. त्याचबरोबर
विज्ञानाची ऑनलाईन लायब्ररीही आपल्याला ऍक्सेस करता येते.
http://ncsu.edu/midlink ही साईट माध्यमिक मुलांसाठी
विज्ञानाचे मासिक काढते. प्रत्येक सहा महिन्यांसाठी प्रोजेक्ट दिला जातो, जसे 'शिकागोचे दगड बोलू लागले तर?', 'केनियामध्ये शिक्षण खूप महाग असल्यामुळे बहुतेक मुले माध्यमिक शिक्षण
पूर्ण करत नाहीत' किंवा 'जड दप्तरांचे
मुलांच्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम'... अश्या अनेक
विषयांच्या प्रकल्पांवर जगभरातल्या मुलांकडून त्यांच्या नोंदी, मते आणि अभ्यास मागविण्यात आला आहे. अश्या साईट्सच्या निमित्ताने मुले
आपला वर्ग सोडून वैश्विक वर्गात सामिल होतात.
http://www.justforkidsonly.com/scinfospace.htm ह्या साईटवर भारतातल्या
मुलांसाठी वयोगटाप्रमाणे विज्ञानाचे विविध विषय समजावून दिले आहेत. काही मजेदार
युक्ताही ह्या साईटवर आहेत जसे की आपल्या सूर्यमालिकेतल्या ग्रहांची नावे लक्षात
ठेवायची असल्यास My Very Excellent Mother
Just Sent Us Nine Pizzas हे वाक्य पाठ हवे. ह्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाच्या
पहिल्या अक्षरात ओळीने ग्रहांची नावे दडलेली आहेत जसे M म्हणजे मार्स, V म्हणजे व्हिनस,E म्हणजे अर्थ... वगैरे.
भारतातही विज्ञान आणि गणित अधिक सोप्या आणि
सहज पध्दतीने मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही
संस्थांच्या वेबसाईट्स अत्यंत उपयुक्त आहेत. www.navnirmiti.org ह्या साईटवरुन गणित आणि
विज्ञान शहरी आणि खेडयातल्या अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून अनेक उपक्रम
राबवले जातात. त्यासाठी त्यांनी अनेक संशोधनात्मक उपकरणे तयार केली आहेत. दहा ते
बारा वर्षांच्या मुलांना विज्ञान शिकवतांना त्या मुलांचे लक्ष विचलीत होण्याची
शक्यता अधिक असते. त्यासाठी नवनिर्मितीने वैज्ञानिक खेळयांबरोबरच विज्ञान पोस्टर्स
तयार केली आहेत. ही पोस्टर्स पाठयक्रमाच्या विविध विषयांवर आधारीत आहेत. प्रत्येक
पोस्टर्सवरील चित्रे आकर्षक, विषयाची स्पष्ट मांडणी करणारी
आणि शिक्षक आणि मुलांमध्ये चर्चा घडवून आणण्यास उपयुक्त आहेत. रोजच्या जीवनातील
उदाहरणांवर आधारीत असल्यामुळे प्राथमिक वर्गांच्या कुठल्याही माध्यमाच्या मुलांना
वापरता येण्यासारखी आहेत. अश्याच प्रकारचा प्रयोग विज्ञानप्रसार आणि
विज्ञानआश्रमानेही (पाबळ) करुन दाखवला आहे त्याविषयी अनुक्रमे www.vigyanprasar.gov.in आणि www.vigyanashram.com ह्या साईटवर माहिती आणि
त्यांच्या विज्ञान खेळ आणि उपक्रमांविषयी माहिती उपलब्ध आहे.
ऍस्ट्रोनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये गती
असणा-या मुलांसाठी पुण्याच्या आयुकाचीwww.iucaa.ernet.in ही साईट उपयुक्त आहे.
विज्ञानाचा प्रसार आणि सोपी विज्ञान खेळणी तयार करणा-या अरविंद गुप्तांची साईट www.vidyaonline.org खजिना आहे. विविध
गोष्टींच्या पुस्तकांबरोबरचUNESCO ने मुलांसाठी तयार केलेले ७०० विज्ञान प्रयोंग
डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ह्या साईटवरच्या लिंक्स वैयक्तीक वापरासाठी
मोफत उपलब्ध आहेत.
इंटरनेटवरच्या साईटसवर अनेक 'रिसोर्स' साईट्स उपलब्ध आहेत. महत्त्वाचे आहे की
त्या कितपत आणि कश्यारितीने मुलांपर्यंत पोहोचतात, ह्या
विषयी विक्रम साराभाई सायन्स सेंटरचे कार्तिकेय साराभाई ह्यांचा अनुभव डोळे
उघडवणारा आहे. कार्तिकेय आणि त्यांचा चमू अहमदाबाद येथील राजोडा गावात मुलांना
गणित आणि विज्ञान शिकवायला जात असत. त्यावेळेला त्यांनी २५X५
असे साधे गणित मुलांना सोडवायला दिले. काही मुले चुकणार ह्याचा त्यांना अंदाज
होताच. वर्गाची उत्तरे १२५, ३०, ४५,
१०५ अश्या गटात मोडणारी होती. त्यापैकी त्यांनी ३०, ४५, १०५ उत्तरे देणा-या गटांचे विश्लेषण करायचे
ठरवले. ३० उत्तर लिहिणा-या गटाने दोन्ही अंकांची बेरीज केली होती.
४५ वाल्यांनी पाचाने पाचाला गुणले परंतु
पाचाने दोनालाही गुणावे लागेल हे माहिती नसल्यामुळे दोन आणि हातचे दोन ह्यांची
बेरीज करुन मोकळे झाले. १०५ उत्तर काढणा-या मुलांनी गुणाकार बरोबर केला परंतु दहा
संख्येत दोन मिळवायचे विसरुन गेले. त्याविषयी शिक्षिकेशी चर्चा केल्यास कळले की
गणित परत समजावून सांगण्यापेक्षा पाढे पाठांतरावर अधिक भर देण्यात येतो. त्यामुळे
गणिताची 'शास्त्रीय' पध्दती
मुलांपर्यंत न पोहोचता पाठांतरावर अधिक भर होता. ह्यासाठी मुले दोषी नाहीत तर
शिक्षक आणि पालकांनी आपण मुलांपर्यंत काय 'कम्यूनिकेट'
करत नाही आहोत ह्यांची नोंद घ्यायला पाहिजे. अश्या अनेक विज्ञान आणि
पर्यावरण संबंधी माहिती, उपक्रम आणि प्रकल्पांविषयी www.greenteacher.org ह्या साईटवर वाचता येते.
विज्ञानाचे गूढ जाणून घेण्यासाठी इंटरनेट हे अत्यंत प्रभावी
माध्यम आहे. म्हणून म्हणतात -
No comments:
Post a Comment