विज्ञान गीत
नव्या युगाचे नविन पंख लावून सारे उडुया
विज्ञानाची कास धरुनी हे जीवन फुलवूया
विज्ञानाची कास धरुनी हे जीवन फुलवूया
नव्या युगाचे नविन पंख हे, सायन्स सायन्स.......धृ
 थोडा विचार करूया सारे, फळ खाली पडतेच का?
 स्विच ऑन केल्यावर मग दिवा पेटतो क्षणात का?
 थोडी बुद्धी चालवा, डोके तुमचे खाजवा 
 न्यूटन, आइनस्टाईन मित्रांनो तुमच्यातच दडला
 नव्या युगाचे नविन पंख हे, सायन्स सायन्स....... १
इंटरनेट जेव्हा आले, जग सारे जवळ आले
हालचाली मग जगातील सार्या कडू लागले वारे
या दुनियेत न जादू , आहेत ढोंगी साधू 
सार्यांमागे दडले विज्ञान तेच या आपण शोधू
नव्या युगाचे नविन पंख हे, सायन्स सायन्स....... २
      -सूजिनकुमार एन. कंसारा
    श्री. बालाजी प्राथ. विद्यालय, पारोळा जि. जळगाव
      मो. नं - ९८५०९७९९२२
No comments:
Post a Comment