फिकट निळ्या रंगाचा,
तिखट वास असणारा,
आणि झोंबणारा ओझोन नावाचा वायू ऑक्सिजनच्या
तीन अणूंपासून बनलेला असतो. हा वायू अस्थिर असतो. तो जेवढ्या वेगाने तयार होतो;
तसाच वेगाने नष्टही होतो. तो उत्तम
ऑक्सिडाइझिंग वायू असून उच्च तापमानाला त्याचे एकदम विघटन होते.
वातवरणात
सर्वत्र कमी जास्त प्रमाणात हा वायू आढळतो. पण पृथ्वीपासून १० ते १५ किमी उंचीच्या
प्रदेशात त्याचे प्रमाण अधिक असते. प्रावरणातील अतिनील किरणांच्या
प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचे विघटन झालेले ऑक्सिजनचे अणू वातवरणातील इतर ऑक्सिजनशी
संयोग पावतात. त्यातूनच ओझोन तयार होतो. वातावरणातील ओझोनचा ऑक्सिजनच्या विघटित
झालेल्या एका अणूशी संयोग झाला की पुन्हा त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये होते.
           ओझोन हा जीवरक्षक वायू आहे.
सूर्याकडून पृथ्वीवर येणार्या लघुतरंग उर्जेतील 'अल्ट्राव्हायोलेट'
किरणांचे शोषण करून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे
संरक्षण ओझोन वायूकडून होत असते. वातवरणातील ओझोनचे प्रमाण कमी झाले तर सूर्याची
अतिनील किरणे पृथ्वीवर सहज पोहचू शकतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान एकदम वाढ्ते.
यालाच ग्लोबल मॉर्मिंग म्हणतात. आणि असे तापमान वाढले;तर
जीवसृष्टी पृथ्वीवर टिकू शकणार नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या आम्लपर्जन्य,
वितळणार्या हिमनद्या व सागरी पातळीत होणारी
वाढ हे परिणाम दिसून येत आहेत. त्वचाविकार, त्वचेचे
कर्करोग, प्रकाशसंश्लेषणात
होणारी घट, हेही परिणाम
ग्लोबल वॉर्मिंगचेच आहेत.
 वातवरणात नैसर्गिकरित्या ओझेनची निर्मिती व र्हास
होत असतो. निर्सगतःच त्यात संतुलन राखले जाते. परंतु आधुनिक जीवनपद्धती आपलीशी
केलेल्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गातील 
ओझोनचे संतुलन कायम राखले जात नाही. आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले
रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर,
विविध पर्फ्युमस अशा अनेक गोष्टीत सीएफसी,
सीटीसी, कार्बन
टेट्राक्लोराइड हे वायू वापरलेले असतात. आणि ओझोनचा र्हास होण्यास तेच कारणीभूत
ठरतात, नित्य वापरातील या
वायुंचे प्रमाण कमी झाले तर ओझोनचे र्हास होण्याचे प्रमाणही कमी होईल.
          या सार्याची जाणीव करून देण्याच्या
उद्देशाने १६ सप्टेंबर हा अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.ओझोनची
निर्मिती, ओझोनचे
उपयोग ,ओझोनच्या र्हासाची
कारणे,ओझोन वाचवण्याचे
उपाय या सार्यांची माहिती सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न
करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
No comments:
Post a Comment