Pages
- होम
- मंडळाविषयी
- तालुका विज्ञान अध्यापक मंडळे
- जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ कार्यकारणी
- मंडळामार्फत राबविण्यात येणारे विज्ञानविषयक कार्यक्रम
- सदस्यता फॉर्म
- फोटो
- विज्ञान प्रदर्शन
- विज्ञान मंच (इयत्ता ९ वी साठी)
- इन्सपायर अवॉर्ड
- अपूर्व विज्ञान मेळावा
- राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
- एन. टी. एस. (इयत्ता १० वी)
- विज्ञान नट्योत्सव (विज्ञान नाटिका )
- अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
- बालश्री पुरस्कार
- एन. एम. एम. एस (इयत्ता ८ वी)
- ग्रामीण विज्ञान छंद मंडळ
- शालेय विज्ञान मंडळ (School Science Club)
- मुख्य सल्लागार मंडळ
- 28th February: National Science Day in India
- तालुका समन्वयकांची यादी
- संपर्क
- NCSC 2022
- वर्तमानपत्रातील बातम्या
Friday, July 20, 2018
Wednesday, July 18, 2018
Tuesday, July 17, 2018
शालेय विज्ञान मंडळ (School Science Club)
शालेय विज्ञान मंडळ (School Science Club )
अमेरिकन लोकांनी प्रथम या कार्यक्रमाला “ शास्त्र मंडळ ” असे नाव दिले. पुढे
भारताने ही कल्पना स्वीकारली व इ. स. १९५५ पासून भारतामध्ये विज्ञान मंडळाची स्थापना होवू लागली.
व्याख्या : मुलांसाठी मुलांनी
चालवलेले व मुलांचेच असते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यात शास्त्रीय दृष्टीकोन
निर्माण होतो. अभिरुचि निर्माण होते व त्यांच्यामध्ये कृतीशीलता आणली जाते. अशा
उपक्रमाला विज्ञान मंडळ म्हणतात.
विज्ञान मंडळाची उद्दिष्टे
शास्त्रीय दृष्टीकोन बिंबवणे.
उदा. चुकीच्या रूढी, परंपरांना फाटा देणे.
शास्त्रीय शोध व निसर्गातील कुतुहुल शोधून काढण्याची सवय
विद्यार्थ्यांना लावणे.
उदा. गुरुत्वाकर्षण व इंद्रधनुष्य.
शास्त्रीय छंदाची आवड निर्माण करणे.
उदा. साबण बनविणे, शाई बनविणे.
शास्त्रीय तत्वे व बाह्य वातावरण यांच्यातील साम्य पहाण्याची संधी
देणे.
उदा. विशिष्ट गुरुत्व.
विद्यार्थ्याची शास्त्रीय दृष्टी विशाल करणे.
विद्यार्थ्यात बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ति निर्माण करणे
विज्ञान नियम व महत्वाचे व्यवहारातील उपयोग जाणून घेणे.
उदा. न्यूटनचे गतीविषयक नियम.
नवनवीन घडामोडींचा परिचय करून देणे.
उदा. टेस्ट ट्यूब बेबी, अंतराळ संशोधन.
विज्ञान मंडळाची रचना
मुख्याध्यापकांनी विज्ञान शिक्षकाच्या मदतीने
मंडळाची घटना,
कार्यकारी मंडळ स्थापन करावे. व त्यांनी खालील
कामेकरावीत
v मंडळाचा हेतु काय असावा?
v मंडळाचे नाव काय ठेवावे?
v सभासद कोण असतील व ते कसे निवडावे?
v पैसा कसा जमवावा? कार्यक्रम कोणते घ्यावेत?
विज्ञान शिक्षक: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व
प्रेरणा देणे. विविध कार्यक्रम राबवून यशस्वीपणे पार पाडणे.
कार्यकारी मंडळ : कार्यकारी मंडळात पुढील
व्यक्तींचा समावेश होतो व त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष : नियोजनपूर्व कार्यक्रमाच्या वेळी
अध्यक्ष म्हणून व कार्यकारी मंडळांच्या बैठकांच्या वेळी उपस्थित राहणे.
सचिव : सभेच्या कामकाजाचा वृतांत ठेवणे. पत्र
व्यवहार करणे.
सहसचिव : सचिवाला मदत करणे.
ग्रंथपाल : विज्ञान मंडळाची पुस्तक खरेदी करून
त्याचे रजिष्टर ठेवणे. तसेच पुस्तक देवाण-घेवाण करणे.
कोषाध्यक्ष : कार्यकारी मंडळाची मंजूरी घेवून
मंडळासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. त्याची नोंद ठेवेणे.
बातमीदार : विज्ञान मंडळाने घेतलेल्या
कार्यक्रमाच्या बातम्या देणे.
सदस्य : प्रत्येक इयत्येचा एक
विद्यार्थी/विद्यार्थीनी सदस्य म्हणून घ्यावा.
विज्ञान मंडळाचे कार्यक्रम
Ø वैज्ञानिक सहली : निसर्ग स्थळांना भेटी देणे.
Ø विज्ञान जत्रा व विज्ञान प्रदर्शन भरविणे.
Ø वैज्ञानिक साधी उपयुक्त उपकरणांची निर्मिती करणे.
Ø विद्यार्थ्यांना वैज्ञानिक चित्रपट, शोध, फिल्मस्ट्रिप दाखविणे.
Ø वैज्ञानिक मॉडेल व वैज्ञानिकांच्या माहितीचेतक्ते तयार करणे.
Ø वैज्ञानिक वस्तुसंग्रह करून प्रदर्शन भरविणे.
Ø वैज्ञानिक दिन साजरे करण
Ø (राष्ट्रीय विज्ञान दिन, राष्ट्रीय वसुनंधरादिन, राष्ट्रीय ओझोन बचाव दिन)
Ø भाषणे आयोजित करणे.
Ø विज्ञान हस्तलिखित तयार करणे.
Ø अंध:श्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करणे.
विज्ञान मंडळ यशस्वी होण्यास आवश्यक घटक
Ø आर्थिक तरतूद, वेळ, साधने, मार्गदर्शन इत्यादि सोयी असाव्यात.
Ø विज्ञान शिक्षक कामकाजात तरबेज,
हुशार, धडपडया अडचनीतून मार्ग काढणारा असावा.
Ø वस्तुसंग्रह भरविणे, व्याख्याने आयोजित करणे, उपकरणे तयार करणे व प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध असावी.
Subscribe to:
Posts (Atom)