*शिक्षण विभाग, जि. प. जळगाव*
आणि
*शिक्षण विभाग, जि. प. जळगाव*
आणि
राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव २०२२ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने नेहरु विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई यांचेकडून मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करावे. या विज्ञान विषयक नाटयस्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभाग घेतील याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.
राष्ट्रीय संग्रहालय परिषद (भारत सरकार), नेहरु विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२-२३ मध्ये विज्ञान नाटयोत्सव विविध स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश आहेत.
उपक्रमाचा हेतू :- विज्ञान नाटयोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पध्दतीने देता यावी तसेच विज्ञान नाटयातून विज्ञान लोकप्रिय व्हावे, आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
मार्गदर्शक सूचना :- २०२२-२३ या वर्षाकरीता विज्ञान नाटयोत्सवाचा मुख्य विषय व उपविषय पुढीलप्रमाणे आहेत.
मुख्य विषय : Science and Technology for the Benefits of Mankind (मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान) हा असून त्या अंतर्गत पुढीलप्रमाणे चार उपविषय दिलेले आहेत.
1) Story of Vaccines (लसीकरणाची कथा)
2) Pandemic: Social & Scientific Issue - (महामारी: सामाजिक व वैज्ञानिक समस्या)
3) Technology Innovation for Improving Quality of Life (जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचे नवकल्पन/संशोधन)
4) Basic Sciences & Sustainable Development (मुलभूत विज्ञान व शाश्वत विकास)
वरील विषय व उपविषयानुसार, पश्चिम भारत झोनल पातळीवरील विज्ञान नाटयोत्सव नोव्हेंबर २०२२ मध्ये नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. याकरीता राज्यातील विज्ञान नाटयोत्सवाचे स्तरनिहाय आयोजन पुढील प्रमाणे करणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरावरील विज्ञान नाटयस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक / क्षेत्रीय अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. प्रत्येक जिल्हयात तालुकास्तरावर सुध्दा विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन करुन जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्हयातून विभाग स्तरासाठी दोन विज्ञान नाटय चमू निवडण्यात यावी. विभागस्तरावरील विज्ञान नाटयोत्सवाची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांचेकडे राहील. त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. विभागस्तरावरुन प्रथम क्रमांक आलेल्या केवळ एका विज्ञान नाटय चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल. राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर तर्फे करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२२ या दरम्यान करण्यात येईल. या स्पर्धेची तारीख व स्थळ यथाशीघ्र कळविण्यात येईल.
प्रत्येक जिल्हयातून निवड झालेल्या दोन विज्ञान नाटय चमूची माहिती विहित सांख्यिकीय प्रपत्रासह आपण संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावी व एक प्रत या कार्यालयास पाठवावी.
तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेसाठी नियम व अटी. -
१. भाग कोण घेवू शकतो ? शासनमान्य शाळेत नियमित शिकणारे (इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत) विद्यार्थी.
२. विज्ञान नाटय पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी कमाल अर्धा तास (३० मिनिटे).
३. भाषा व विषय :- विज्ञान नाटय हे हिंदी, मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासन मान्य भाषेतून सादर करता येईल. विज्ञान नाटय हे दिलेल्या विषय / उपविषय यावरच आधारित असणे आवश्यक आहे.
४. विज्ञान नाटयाच्या एका चमूत जास्तीत जास्त ८ पात्र विद्यार्थी / विद्यार्थीनी सहभागी होवू शकतात. विज्ञान नाटयाच्या एका चमूत विद्यार्थी / विद्यार्थीनी कमाल ८ संख्या याव्यतिरिक्त मार्गदर्शक शिक्षक, संगीतकार, गायक वादक, नेपथ्यकार, मदतनीस इत्यादींचा समावेश होईल. परंतु प्रत्यक्ष मंचावर विज्ञान नाटय सादर करतांना सादरकर्ते विद्यार्थी/विद्यार्थीनी हे जास्तीत जास्त ८ या संख्येत असतील. याव्यतिरिक्त मंचावरील नाटयाच्या दृष्टीने कोणाचाही प्रवेश नियमबाहय समजण्यात येईल. पडदयामागील कलाकारांच्या/मदतनीसांच्या समावेशाबाबत नाटय चमूचे अधिकार असतील.
5.पंच (Judges) विज्ञान नाटयाचे परिक्षण करतांना ०३ पंच (Judges) असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यापीठ किंवा संशोधन विभाग यासारख्या शैक्षणिक संस्थामधील विज्ञान तसेच कला, नाटय, संगीत विषयाचे जाणकार (तज्ज्ञ) मान्यवर व्यक्तींना शक्यतोवर पंचाचे कार्य सोपवावे. सहभागी शाळेतील शिक्षकांची पंच म्हणून नेमणूक करण्यात येवू नये. या विज्ञान नाटय स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील.
६. कोणत्याही परिस्थितीत दोन नाटय चमूंना सारखे गुणदान होणार नाही याची पंचांनी दक्षता घ्यावी. अशावेळी सारखे गुणदान झाल्यास पनुर्मुल्यांकन करुन पंचांनी अंतिम निर्णय घ्यावा. पंचांचा निर्णय सर्वांकरिता मान्य व बंधनकारक राहील.
७. विज्ञान नाटय मूल्यमापनाचे निकष -
अ) Presentation of the science drama (नाटयाचे सादरीकरण) - ५० गुण
ब) Scientific content in the drama (नाटयातील वैज्ञानिक माहिती) - ३० गुण
क) Effectiveness of drama (विज्ञान नाटयाची परिणामकारकता) - २० गुण
८. विज्ञान नाटयाच्या दर्जेदार सादरीकरणाकरिता पोष्टर्स, बॅनर्स, दृकश्रवण माध्यमे इत्यादींचा वापर नाटय चमूने (स्वतः) करणे अपेक्षित आहे.
९. नाटय चमूने नाटय सादरीकरणापूर्वी नाटयाचे नेपथ्य ( Script) परीक्षकांना किमान दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.
१०. विभागस्तरीय नाटय स्पर्धेकरिता आर्थिक तरतूद पुढीलप्रमाणे प्रस्तावित आहे
१. परीक्षक मानधन- (३ परीक्षक x रु. ५००/-)- रु.१५००/
२. बक्षिसे :
अ) प्रथम रु.२०००/
ब) द्वितीय रु.१५००/
क) तृतीय- रु.१०००/
३. सादिलवार खर्च ( ध्वनी, प्रकाश, प्रमाणपत्रे छपाई इ.)
रु.५०००/ असा एकूण रुपये ११,०००/- इतका खर्च विभागस्तराकरिता मंजूर राहील.
राज्यस्तरीय विज्ञान नाटय स्पर्धा : राज्यस्तरावर सहभागी झालेल्या प्रत्येक विभागातील प्रथम क्रमाकांच्या नाटय चमूतील कमाल ०८ (आठ) विद्यार्थ्यांचा प्रवास व दैनिक भत्ता (निवास व भोजन खर्च वजा करुन) प्रवास खर्च जवळच्या मार्गाने (एसटी किंवा रेल्वे द्वितीय श्रेणी) या संस्थेमार्फत अदा करण्यात येईल. शिक्षकांचा खर्च, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता शाळेच्या आस्थापनेतून काढावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले प्रवास तिकीट सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच उपरोक्त दिशानिर्देशाप्रमाणे स्तरनिहाय विज्ञान नाटय स्पर्धांचे आयोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
|
|