Pages

Wednesday, June 28, 2023

तालुका समन्वयक व सह समन्वयक ऑनलाइन सहविचार सभा २०२३

 *शिक्षण विभाग, जि. प. जळगाव*

आणि

जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ
 आयोजित
 तालुका समन्वयक व सह समन्वयक ऑनलाइन सभा
दि. 19 जून 2023
आज शिक्षण विभाग जळगाव व जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित तालुका समन्वयक व सह समन्वयकांची सभा संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर राजे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद जळगाव चे उपशिक्षणाधिकारी मा. श्री. एजाज शेख साहेब उपस्थित होते. आज सभेसाठी  रावेर, भुसावळ, जळगाव, बोदवड, धरणगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, एरंडोल  अशा एकूण 11 तालुक्यांचे समन्वयक व सह समन्वयक  उपस्थित होते. सभेमध्ये सर्वानुमते ठरविल्याप्रमाणे  खालील वर्षभराचे  नियोजन करण्यात आले आहे.
आगामी शैक्षणिक भेटी व कार्यशाळा आणि वैज्ञानिक उपक्रमांचे  वार्षिक नियोजन
1. ISRO Visit -
 मुख्य जबाबदारी : श्री. सी. डी. पाटील सर, मुक्ताईनगर
2. होमी बाबा विज्ञान केंद्र, मुंबई भेट -
 मुख्य जबाबदारी : श्री सुनील वानखेडे सर - भुसावळ
                           श्री. संदिप पाटील सर - रावेर
3. STEM कार्यशाळा -
 मुख्य जबाबदारी :
1. श्री आर वाय चौधरी सर, पाचोरा
2. श्रीमती योगिता झांबरे मॅडम - रुईखेडा 
3. श्रीमती अल्फा कोटेजा मॅडम- पाचोरा
4. श्रीमती अर्चना देशमुख मॅडम- कुऱ्हा काकोडा
5. श्री एस एस ठाकोर सर - मुक्ताईनगर

4. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 -
 मुख्य जबाबदारी :
1. श्री एस आर महाजन, रावेर
2. श्री निरंजन पेंढारे सर, अमळनेर
3. श्री सचिन करमरकर सर, चोपडा

5. विज्ञान नाट्यत्सव 2024-
 मुख्य जबाबदारी :
1. श्री अमोल वाणी सर, एरंडोल
2. श्री संजय पाटील सर, चोपडा
3. श्रीमती वनिता अग्रवाल मॅडम, बोदवड

6. वर्षभरातील ऑनलाईन व ऑफलाईन मीटिंग जबाबदारी-
1. श्री बी आर महाजन सर, धरणगाव
2. श्री नवनीत सपकाळे सर, धरणगाव


श्री किशोर राजे, अध्यक्ष जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ
श्री सुनील वानखेडे, सचिव जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ




Friday, August 19, 2022

राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव २०२२-२३

 राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव २०२२ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने नेहरु विज्ञान केंद्रवरळीमुंबई यांचेकडून मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करावे. या विज्ञान विषयक नाटयस्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभाग घेतील याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.

राष्ट्रीय संग्रहालय परिषद (भारत सरकार)नेहरु विज्ञान केंद्रवरळीमुंबई आणि शालेय शिक्षण विभागमहाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२-२३ मध्ये विज्ञान नाटयोत्सव विविध स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश आहेत.

उपक्रमाचा हेतू :- विज्ञान नाटयोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थीशिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहितीघटना आणि संकल्पना मनोरंजक पध्दतीने देता यावी तसेच विज्ञान नाटयातून विज्ञान लोकप्रिय व्हावेआणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. 

मार्गदर्शक सूचना :- २०२२-२३ या वर्षाकरीता विज्ञान नाटयोत्सवाचा मुख्य विषय व उपविषय पुढीलप्रमाणे आहेत.

मुख्य विषय : Science and Technology for the Benefits of Mankind (मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान) हा असून त्या अंतर्गत पुढीलप्रमाणे चार उपविषय दिलेले आहेत.

1) Story of Vaccines (लसीकरणाची कथा)

2) Pandemic: Social & Scientific Issue - (महामारी: सामाजिक व वैज्ञानिक समस्या)

3) Technology Innovation for Improving Quality of Life (जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचे नवकल्पन/संशोधन)

4) Basic Sciences & Sustainable Development (मुलभूत विज्ञान व शाश्वत विकास)

वरील विषय व उपविषयानुसारपश्चिम भारत झोनल पातळीवरील विज्ञान नाटयोत्सव नोव्हेंबर २०२२ मध्ये नेहरु विज्ञान केंद्रमुंबई येथे घेण्यात येणार आहे. याकरीता राज्यातील विज्ञान नाटयोत्सवाचे स्तरनिहाय आयोजन पुढील प्रमाणे करणे आवश्यक आहे. 

जिल्हास्तरावरील विज्ञान नाटयस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक / क्षेत्रीय अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. प्रत्येक जिल्हयात तालुकास्तरावर सुध्दा विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन करुन जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्हयातून विभाग स्तरासाठी दोन विज्ञान नाटय चमू निवडण्यात यावी. विभागस्तरावरील विज्ञान नाटयोत्सवाची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांचेकडे राहील. त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. विभागस्तरावरुन प्रथम क्रमांक आलेल्या केवळ एका विज्ञान नाटय चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल. राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन राज्य विज्ञान शिक्षण संस्थानागपूर तर्फे करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२२ या दरम्यान करण्यात येईल. या स्पर्धेची तारीख व स्थळ यथाशीघ्र कळविण्यात येईल.

प्रत्येक जिल्हयातून निवड झालेल्या दोन विज्ञान नाटय चमूची माहिती विहित सांख्यिकीय प्रपत्रासह आपण संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावी व एक प्रत या कार्यालयास पाठवावी.

तालुकास्तरजिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेसाठी नियम व अटी. -

१. भाग कोण घेवू शकतो शासनमान्य शाळेत नियमित शिकणारे (इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत) विद्यार्थी.

२. विज्ञान नाटय पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी कमाल अर्धा तास (३० मिनिटे).

३. भाषा व विषय :- विज्ञान नाटय हे हिंदीमराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासन मान्य भाषेतून सादर करता येईल. विज्ञान नाटय हे दिलेल्या विषय / उपविषय यावरच आधारित असणे आवश्यक आहे.

४. विज्ञान नाटयाच्या एका चमूत जास्तीत जास्त ८ पात्र विद्यार्थी / विद्यार्थीनी सहभागी होवू शकतात. विज्ञान नाटयाच्या एका चमूत विद्यार्थी / विद्यार्थीनी कमाल ८ संख्या याव्यतिरिक्त मार्गदर्शक शिक्षकसंगीतकारगायक वादकनेपथ्यकारमदतनीस इत्यादींचा समावेश होईल. परंतु प्रत्यक्ष मंचावर विज्ञान नाटय सादर करतांना सादरकर्ते विद्यार्थी/विद्यार्थीनी हे जास्तीत जास्त ८ या संख्येत असतील. याव्यतिरिक्त मंचावरील नाटयाच्या दृष्टीने कोणाचाही प्रवेश नियमबाहय समजण्यात येईल. पडदयामागील कलाकारांच्या/मदतनीसांच्या समावेशाबाबत नाटय चमूचे अधिकार असतील.

5.पंच (Judges) विज्ञान नाटयाचे परिक्षण करतांना ०३ पंच (Judges) असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यापीठ किंवा संशोधन विभाग यासारख्या शैक्षणिक संस्थामधील विज्ञान तसेच कलानाटयसंगीत विषयाचे जाणकार (तज्ज्ञ) मान्यवर व्यक्तींना शक्यतोवर पंचाचे कार्य सोपवावे. सहभागी शाळेतील शिक्षकांची पंच म्हणून नेमणूक करण्यात येवू नये. या विज्ञान नाटय स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील.

६. कोणत्याही परिस्थितीत दोन नाटय चमूंना सारखे गुणदान होणार नाही याची पंचांनी दक्षता घ्यावी. अशावेळी सारखे गुणदान झाल्यास पनुर्मुल्यांकन करुन पंचांनी अंतिम निर्णय घ्यावा. पंचांचा निर्णय सर्वांकरिता मान्य व बंधनकारक राहील.

७. विज्ञान नाटय मूल्यमापनाचे निकष -

अ) Presentation of the science drama (नाटयाचे सादरीकरण) - ५० गुण

ब) Scientific content in the drama (नाटयातील वैज्ञानिक माहिती) - ३० गुण

क) Effectiveness of drama (विज्ञान नाटयाची परिणामकारकता) - २० गुण

८. विज्ञान नाटयाच्या दर्जेदार सादरीकरणाकरिता पोष्टर्सबॅनर्सदृकश्रवण माध्यमे इत्यादींचा वापर नाटय चमूने (स्वतः) करणे अपेक्षित आहे.

९. नाटय चमूने नाटय सादरीकरणापूर्वी नाटयाचे नेपथ्य ( Script) परीक्षकांना किमान दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

१०. विभागस्तरीय नाटय स्पर्धेकरिता आर्थिक तरतूद पुढीलप्रमाणे प्रस्तावित आहे

१. परीक्षक मानधन- (३ परीक्षक रु. ५००/-)- रु.१५००/

२. बक्षिसे :

अ) प्रथम रु.२०००/

ब) द्वितीय रु.१५००/

क) तृतीय- रु.१०००/

३. सादिलवार खर्च ( ध्वनीप्रकाशप्रमाणपत्रे छपाई इ.)

रु.५०००/ असा एकूण रुपये ११,०००/- इतका खर्च विभागस्तराकरिता मंजूर राहील.

राज्यस्तरीय विज्ञान नाटय स्पर्धा : राज्यस्तरावर सहभागी झालेल्या प्रत्येक विभागातील प्रथम क्रमाकांच्या नाटय चमूतील कमाल ०८ (आठ) विद्यार्थ्यांचा प्रवास व दैनिक भत्ता (निवास व भोजन खर्च वजा करुन) प्रवास खर्च जवळच्या मार्गाने (एसटी किंवा रेल्वे द्वितीय श्रेणी) या संस्थेमार्फत अदा करण्यात येईल. शिक्षकांचा खर्चप्रवास भत्ता व दैनिक भत्ता शाळेच्या आस्थापनेतून काढावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले प्रवास तिकीट सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच उपरोक्त दिशानिर्देशाप्रमाणे स्तरनिहाय विज्ञान नाटय स्पर्धांचे आयोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करावी.


Friday, July 10, 2020

सर्व शिक्षकांसाठी गणित कार्यशाळा

आयोजक -
जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव.                         
प्रयास फौंडेशन, जळगाव आयोजित.

 विषय-भारतीय गणित परंपरा व गणित अध्यापन तंत्र

दिनांक ११ जुलै शनिवार
वेळ - दुपारी 4.00 वाजता

प्रमुख वक्ते- दिलीप गोटखिंडीकर, नाशिक
 प्रमुख पाहुणे - सौ.साधना किशोर राजे
अध्यक्षा :  प्रयास फौंडेशन, जळगाव.
सदर आँनलाईन वेबिनार आपल्याला जळगांव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव च्या लाईव्ह फेसबुक वर...
facebook link : https://www.facebook.com/groups/jjvam/
 या लिंक वर  तसेच झूम अॅपवर पहायला मिळणार आहे.तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा...

Thursday, June 18, 2020

राज्यस्तरीय शैक्षणिक मंथन 2020

20 ते 22 जून तीन दिवसीय शैक्षणिक वेबिनार


सर्व पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांच्यासाठी तीन दिवसीय शैक्षणिक वेबिनार 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या वेबिनार चे उद्घाटन 20 जून ला दुपारी 4:00 वाजता शिक्षण राज्यमंत्री मा. ना. बच्चू कडू साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
1. सहभागी होणेसाठी खालील गुगल फॉर्म च्या लिंक द्वारे नोंदणी करावी. 
गूगल फॉर्म लिंक - https://forms.gle/c73qLSaNd15XfmnD6
2. नोंदणी केल्यानंतर टेलिग्राम च्या खालील लिंक द्वारे ग्रुप मध्ये सहभागी व्हावे. त्या ग्रुपवर इतर सूचना व ऑनलाइन मीटिंग बाबत कळवले जाईल.
टेलिग्राम ग्रुप लिंक -
https://t.me/joinchat/PFoMzhpnTWakjwhHoRpIWg
3.या शैक्षणिक वेबिनारचे तीनही दिवस लाईव्ह प्रक्षेपण
https://www.facebook.com/groups/jjvam या विज्ञान मंडळाच्या फेस बुक पेज वरून करण्यात येईल.
4. ३ दिवस सहभाग नोंदविणार्‍या व फीडबॅक फॉर्म भरणार्‍या सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
फीडबॅक फॉर्म ची लिंक - 
https://forms.gle/GsQNsQnemaCDGrKN9

Blog :  www.jjvam.blogspot.com
E-mail : jjvam12@gmail.com
Facebook Page : - https://www.facebook.com/groups/jjvam
YouTube Channel : -  https://www.youtube.com/channel/UCelUDrb9lnf6AtL_SVe9

Saturday, June 13, 2020

जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा 2020 निकाल

जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
जळगाव शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव 
आणि
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विपनेट क्लब (VP-MH039)
डॉ. सी. व्ही. रमन विपनेट क्लब (VP-MH004)
आयोजित
जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा 2020 निकाल
लहान गट (इयत्ता 6 वी ते 8 वी) 
प्रथम –  (S9) -  प्रणाली विजय वाघ - इंदिराबाई ललवानी माध्यमिक विद्यालय ' जामनेर 
द्वितीय - (S5) - हर्षल विनोद बारी - के नारखेड़े विद्यालय '  भुसावल 
तृतीय - (S8) - दर्शना दादू कापडे - पी आर हाइस्कूल - धरणगाव 
उत्तेजनार्थ  -  1) (S19) - अखिलेश नितिन भोम्बे - जे ई स्कूल मुक्ताईनगर
2) (S11) -  मधुरा दिनेश मोरे  - एस जी एस हाइस्कूल पाचोरा

मोठा गट (इयत्ता 9 वी ते 12 वी)
प्रथम – (L39) - रसिका मुकुंद ढेपे  - प न लुंकड़ कन्या स्कूल - जळगाव 
द्वितीय- (विभागुन)  1) (L9) -  मंथन कांतिलाल कुमावत  - ऐ बी बॉयज स्कूल -  चालीसगांव
2) (L15) - अपूर्वा राजेन्द्र अकोले  - सौ कमलाबाई सुंदरलाल अग्रवाल गर्ल्स हाइस्कूल , रावेर 
तृतीय - (L32) - ज्ञानदा शरद वसनकर  - इंदिराबाई ललवानी जूनियर कॉलेज, जामनेर
उत्तेजनार्थ - 1) (L20) -  इंद्रायणी उदयराव भोसले  - तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय , चालीसगांव
2) (L27) - विधान भरत पाटिल  - पंकज विद्यालय, चोपडा

Friday, June 5, 2020

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2020 नोंदणी

जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://forms.gle/Q1hphQYo3aCM2orj7

GOVERNMENT OF INDIA REG. NO. VP-MH0004 & VP-MH039
मार्च 2020 पासून आपण सर्व कोविड-19 च्या संकटाला तोंड देत आहे. या कोविड-19 ने आपल्या जीवनशैलीमद्धे अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. ही महामारी कधी संपेल माहीत नाही. म्हणून त्यासोबत जगण्याची सकारात्मकता घेवून आपली परंपरा जपून यावर विजय मिळवायचा आहे.

जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ,जळगाव
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , जळगाव
आणि
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विपनेट क्लब (VP-MH0039)
डॉ. सी. व्ही. रमण विपनेट क्लब (VP-MH0004)
आयोजित
जिल्हास्तरीय वक्तृत्व
स्पर्धा 2020

                                                                        

  
: दोन्ही गटांसाठी स्पर्धेचे विषय :
1. परंपरा जपूया कोरोनाला हरवूया
2. कोरोना इष्टापत्ती का दृष्टापत्ती?
3. आजीचा बटवा, कोरोनाला चकवा
                लहान गट  इ. 6 वी ते 8 वी        मोठा गट इ. 9 वी ते 12 वी
: स्पर्धेसाठी सुचना :
1. स्पर्धा ऑनलाइन आहे. स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही.
2. ऑनलाइन झूम APP द्वारे आपल्याला वरील कोणत्याही एका विषयावर भाषण द्यायचे आहे.
4.दोन्ही गटांसाठी स्पर्धेचे विषय सारखे आहेत.  लहान गटासाठी 3 मिनिटेमोठया गटासाठी 4 मिनिटाचा वेळ राहील
3. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी www.jjvam.blogspot.com या ब्लॉगवर जावून आपली नोंदणी करावी. नोंदणीची अंतीम दिनांक 8 जून 2020 आहे.    
4. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जातील.त्यांना स्मूर्तीचिन्ह व ई-प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र 
5. परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.
6. स्पर्धेची दिनांक व वेळ ग्रुप तयार करून त्यावर कळविण्यात येईल.
7. ही स्पर्धा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच आहे.
संपर्क : बी. बी. जोगी (9226709248), सुनिल वानखेडे (7588687955) , संदिप पाटील (7875925170)